◻️ २०२४ साली पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार
संगमनेर LIVE (कोल्हार) | प्रधानमंत्री म्हणून नव्हे तर प्रधानसेवक म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरीकांसाठी योजनांच्या माध्यमातून निर्णय केले. लोकहीत आणि देशहिताच्या निर्णयामुळेच भारत देशाची प्रतिमा उंचावली असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने महा जनसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात कोल्हार येथे अभियानाच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी कोल्हार येथे ग्रामस्थ व्यापारी यांच्याशी संवाद साधून केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहीती दिली.भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, स्वप्निल निबे, साहेबराव दळे, धनंजय दळे, ॠषिकेश खांदे, ॠषिकेश खर्डे यांच्यासह सर्व संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांनी या महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची देताना म्हणाले की, मागील नऊ वर्षात या देशातील सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून निर्णय झाले. प्रत्येक योजनेचा लाभ लाभार्थ्यांना बॅकेच्या माध्यमातून थेट मिळत आहे. त्यामुळे योजनेतील अंमलबजावणीत पारदर्शकता आली आहे.
देशामध्ये आज मोदींच्या विरोधात तिसऱ्या आघाडीचा होत असलेला प्रयोग कधीही यशस्वी होणार नाही. आघाड्यांचे प्रयोग कसे असतात हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. त्यामुळे २०२४ साली पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास व्यक्त करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील नऊ वर्षात केवळ लोकहित आणि देशहिताचे निर्णय झाले. या निर्णयातून देश आज आत्मनिर्भर झाला आहे. जगात पाचव्या क्रमांकाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून देशाची प्रतिमा उंचावली आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा मार्ग मोदी यांनी सर्वांना दाखवून दिल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केले.
९ वर्षात भ्रष्ट्राचाराचा एकही आरोप केंद्र सरकारवर होवू शकलेला नसल्याचा अभिमान देशवासियांना आहे केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्य सरकार करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनच्या सरकारला आता उपमुख्यमंत्री अजीत पवारांच्या माध्यमातून तिसरेही इंजिन जोडले गेल्याने हे सरकार आता वेगान पुढे जात असून, गतीमानतेने निर्णयांची अंमलबजावणी होत आहे.
शासन आपल्या दारी या उपक्रमातून लाखो नागरीकांना मिळत असलेला न्याय ही राज्य सरकारची खरी उपलब्धी आहे. आता प्रशासनातील आधिकाऱ्यांना लोकांमध्ये जावून योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याकडे लक्ष वेधून, मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, महसूल विभागाच्या माध्यमातून नव्या धोरणांची अंमलबजावणी होत असून याप्रसंगी प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी शासकीय योजनांची माहीती दिली.
दरम्यान या महाजनसंपर्क अभियानांच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित नागरीकांच्या समस्यांही जाणून घेतल्या. आलेल्या निवेदनांवर तातडीने कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी उपस्थित आधिकाऱ्याना दिल्या.