प्रवरेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील “अभियांत्रिकी” विभाग ठरला शंभर नंबरी!

संगमनेर Live
0
◻️ १०० टक्के विद्यार्थ्याची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

संगमनेर LIVE (लोणी) | लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील “इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल अभियांत्रिकी” विभागाच्या १०० टक्के विद्यार्थ्याची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. अशी माहीती प्राचार्य डाॅ. संजर गुल्हाने यांनी दिली.

यामध्ये जेएनके इंडिया प्रा. लि., ठाणे मध्‍ये चार विद्यार्थी, इमर्सन एक्‍सपोर्ट इंजिनीअरिंग, नाशिक मध्‍ये तीन विद्यार्थी, प्राज इंडस्ट्रीज लि., पुणे मध्‍ये एक विद्यार्थी, टोयो इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि., मुंबई मध्‍ये चार विद्यार्थी, प्रोसेका इंजिनिअर्स अँड ऑटोमेशन प्रा. लि., पुणे मध्‍ये तीन विद्यार्थी, आर्टी फ्लो कंट्रोल प्रा. लि., पुणे मध्‍ये पाच विद्यार्थी, कॉटमॅक इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., पुणे मध्‍ये तीन विद्यार्थी, मोज इंजिनिअरिंग सिस्‍टम लि., पुणे मध्‍ये एक विद्यार्थी, किमाया ऑटोमेशन प्रा. लि., पुणे मध्‍ये दोन विद्यार्थी आणि आरती ड्रग्‍स लि., ठाणे मध्‍ये  चार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, असे प्राचार्य डाॅ. संजय गुल्हाने यांनी दिली.

इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत कडू म्हणाले, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी नेहमीच प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ व प्लेसमेंट साठी विविध कोर्सेस व ऍक्टिव्हिटी चे आयोजन केले जाते. यामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, ऍप्टीट्युड टेस्ट, सॉफ्टवेअर व स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस, एंटरप्रीन्यूअरशिप इंटरनॅशनल प्रोग्रॅम, करियर गायडन्स, सराव मुलाखत इत्यादी उपक्रमांचा अंतर्भाव आहे. 

महाविद्यालयातील इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण अभियांत्रिकी विभाग हा १९८५ साली सुरू झालेला पुणे विद्यापीठातील प्रथम कोर्स असून आतापर्यंत सुमारे सतराशे विद्यार्थी पास आऊट होऊन जगातील सर्व नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर यशस्वीपणे कार्यरत आहेत. या माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे. महाविद्यालयामध्ये आयोजित होणाऱ्या एक्सपर्ट लेक्चर, गेस्ट लेक्चर, ईनटर्नशिप, इंडस्ट्रियल व्हिजिट, मॉक इंटरव्यूव व प्लेसमेंट इत्यादी उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

महाविद्यालयातील इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल अभियांत्रिकी विभागाने उत्कृष्ट निकालाची परंपरा, माजी विद्यार्थ्यांचा सहयोग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, लॅब डेव्हलपमेंटसाठी किमाया ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे कडून मिळालेले १२.४१ लाख किमतीचे नॅशनल इन्स्ट्रुमेंट्स प्रायोजित सेंटर ऑफ एक्सलन्स, प्रोजेक्ट अनुदान आणि विविध नामांकित कंपन्यांसोबत केलेल्या संलग्नता करार यामुळे इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल अभियांत्रिकी विभागाने यावर्षीही १०० टक्के प्लेसमेंट ची परंपरा कायम राखली आहे. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट होण्यासाठी इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत कडू, प्रा. डॉ. प्रताप विखे आणि प्लेसमेंट समन्वयक प्रा. वर्षा भोसले तसेच सर्व स्टाफ मेंबर्स यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या या प्लेसमेंट बाबत संस्थेचे अध्यक्ष आणि महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव मा. भारत घोगरे पाटील तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी अभिनंदन केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !