◻️ पानोडी गावांच्या विकासाकरिता ११ कोटीचा भरीव निधी
संगमनेर LIVE | एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा गावांच्या सर्वागीण विकासाकरिता राजकारणविरहीत सर्वानी एकत्र येवून सहकार्याची भूमिका ठेवल्यास गावांचा सर्वागीण विकास होतो. सत्ता असो नसो विखे पाटील परिवारावर जनता दाखवित असलेला विश्वास विकास कामातून आम्ही सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले .
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या ४ कोटी ८३ लाख रुपये किंमतीची जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभा प्रसंगी सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसंरपच नानासाहेब शिंदे हे होते. गटविकास आधिकारी अनिल नागणे, जलसंधारण अभियंता के. के. बिडगर, ग्रामिण पुरवठा विभाग अभियंता श्रीरंग गडधे, जि. प. माजी सदस्य रोहीनीताई निघुते, पचायत समिती माजी सदस्य निवृत्ती सांगळे, तबाजी मुन्तोडे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संदिप घुगे, प्रवरा बँकेचे संचालक अजय ब्राह्मणे, आण्णासाहेब म्हस्के, जेहूरभाई शेख, राजू नागरे, ग्रामसेवक एस. एम. ब्राह्मणे, जलसंधारण आधिकारी मुळे, पचायत समिती आधिकारी ठाकूर आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
सौ. शालिनीताई विखे पाटील पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाला रोटी, जल और मकान हे मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना सुरु केल्या. ज्याचे अनुकरण करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील आपल्या प्रत्येक माणसाना या योजनेत सामील करुन घेत आहे. जल जीवन योजना ह्या गावांगावी पोहचवून हर घर जल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या योजनेतुन खऱ्या अर्थाने महीला समाधानी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिर्डी मतदारसंघांमध्ये जोडली गेली २६ गावाची त्याकाळातील परिस्थिती आणि आताची परिस्थिती बघा ! लोकांना आणि लोकांच्या अडचणी समजून घेतल्यास विकास निश्चित होतो. जिल्हा परिषदमध्ये काम करताना ७५ सदस्यांना भेदभाव न करता न्याय दिला. घरकुले , अंगणवाडी, रस्ते, पाणी योजना, शाळेकरिता खोल्यासह विविध योजना जिल्ह्यात राबविल्या.
शासनाकडून विकासकामाचा मोठा लाडू आपल्याला मिळतो परंतु खाली येईपर्यंत त्याचा भूगा झालेला असतो म्हणून हा भूगा होऊ नये यासाठी लोकांनी काळजी घेतली पाहिजे. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून छोटे - मोठे उद्योग व्यवसाय सुरु केल्यास आपल्या प्रपंच्याला हातभार लागतो. राजकारणात हार - जीत चालू असते त्यामुळे विकासाची कामे थांबत नाही भविष्य शोधावे लागते एक दिवस निश्चित येतो.
गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या लोकांना भेडसावत होत्या . राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांने पंतप्रधान जलजीवन योजना मंजूर झाल्याने भविष्यात पानोडीकरांना पाण्याची टंचाई भासणार नाही. या योजनेमुळे कित्येक वर्षाने लोकाचे स्वप्न साकार झाल्याचे समाधान दिसत असल्याचे सौ. विखे म्हणाल्या.
यावेळी संदिप घुगे, अशोक तळेकर यांची भाषणे झाली असून यावेळी राजेंद्र जाधव, रावसाहेब घुगे, भाऊसाहेब चव्हाण, नानासाहेब तळेकर, ग्रा. प. सदस्य संजय जाधव, भारत शेवाळे, नाना उर्फ सुधाकर कदम, बाळासाहेब कदम, रंगन्नाथ मुंढे, नय्युम सय्यद, पुंजा नागरे, पांडूरंग सांगळे, अशोक सांगळे, नामदेव हजारे, दिपक जाधव, सुभाष पवार, रामभाऊ कदम, रामभाऊ घुगे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वयोश्री, दिव्यांग या सर्वसामान्याच्या योजना मोठ्या राबविल्या. यावर्षी पानोडी गावांच्या विकासाकरिता ११ कोटीचा भरीव निधी देण्यात आला.