◻️ उद्या मंगळवारी सकाळी होणार अंत्यविधी
◻️ दरेवाडी येथिल रहिवासी तर शेडगावचे होते भाचे
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथिल रहिवासी असलेले व सध्या नोकरी निमित्त मुंबई येथे स्थायिक असलेले सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव मानाजी नांगरे (वय - ५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून दोन्ही मुले नोकरीनिमित्त परदेशात असल्याने ते आल्यानंतर उद्या मंगळवार दि. ११ जुलै रोजी मुंबई येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव मानाजी नांगरे हे कुरार पोलीस ठाणे, मालाड (मुंबई) येथे कार्यरत होते. काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्याची तब्येत खालावल्याने नुकतेच त्यांचे निधन झाले आहे. दिवंगत नांगरे हे पोलीस दलातील एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून सर्वाना परिचित होते. चेहऱ्यावरून ते कठोर दिसत असले तरी त्याच्या आतमध्ये एक हळवे व्यक्तित्व दडले असल्याची आठवण त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने सांगितली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव मानाजी नांगरे हे शेडगावचे भाचे तसेच राजेंद्र देवराम आंधळे, कैलास कारभारी आंधळे, विलास रामकृष्ण आंधळे, बाबासाहेब तुकाराम आंधळे यांचे ते आतेभाऊ होते. त्यामुळे दरेवाडी प्रमाणेचं शेडगाव व आश्वी पंचक्रोशीत देखिल त्यांच्या निधनाने शोककळा पसरली असून समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात नांगरे यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तर त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार असून नोकरीनिमित्ताने त्याची दोन्ही मुले परदेशात आहेत. त्यामुळे ते येण्यास वेळ लागणार असल्याने अंत्यविधीला उशीरा होत असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान उद्या मंगळवार दि. ११ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. शिवधाम स्मशानभूमी, गोरेगाव चेक नाका, गोरेगाव पुर्व, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयानी संगमनेर लाईव्हला दिली आहे.