◻️ प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधीची उपलब्धता
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील बारा महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामाकरीता पंतप्रधामंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ६६ कोटी ८३ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
ग्रामीण भागातून येणारे सर्व रस्तांच्या कामाकरीता प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनोतून निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यासर्व प्रस्तावांना मंजूरी मिळून निधीची उपलब्धता व्हावी म्हणून पाठपुरवा केल्यामुळे एकूण बारा रस्त्यांच्या कामासाठी ६६ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
निधी मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये प्रामुख्याने गुंजाळवाडी राजापूर निमगाव भोजापूर चिकणी या ११ किलोमीटर रस्त्याकरीता ९ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने या भागातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.शहराला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याचे होणारे काम सर्वासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
जिल्हा बाॅर्डर आशापीर बाबा चिंचोली गुरव नान्नज दुमाला बिरेवाडी सोनोशी मालदाड या गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी १४ कोटी ४५ लाख, पिंपळे मालदाड संगमनेर या मार्गासाठी ४ कोटी ३७ लाख, शेडगाव, मांलुजे, डिग्रस, रणखांबवाडी, दरेवाडी, कौठे मलकापूर, म्हैसगाव, रस्त्याकरीता ४ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने राहुरीकडे जाणाऱ्या वाहतुकीला मोठी मदत होणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
तळेगाव दिघे ते तालुका हद्दी पर्यतच्या मार्गाकरीता २ कोटी ३४ लाख, कोल्हेवाडी, जोर्वे रस्त्याकरीता २ कोटी ९८ लाख, पिंपरणे ते कोळवाडे शिरापूर रस्त्याकरीता ४ कोटी ९६ लाख, राजापूर ते राज्यमार्ग क्र.५० चिखली रस्ता ३ कोटी ५७ लाख, नांदूर खंदरमाळ ते मोरवाडी बावपठार ३ कोटी ७ लाख, राज्यमार्ग क्र. ६० घारगाव, शेळकेवाडी, अकालापूर या गावातील रस्त्याकरीता ३ कोटी ३१ लाख रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
सारोळे पठार ते धादवडवाडी रस्ता २ कोटी ९४ लाख, रणखांबवाडी फाटा ते रणखांबवाडी, कुंभारवाडी, वरंवडी रस्त्याकरीता १ कोटी १८ लाख रूपयांच्या निधीला मान्यता मिळाल्याने रस्त्यांची काम गतीने पूर्ण होतील असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.