◻️ धार्मिक, कृषी, शिक्षण तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात उमटवला आपल्या चतुरस्त्र कामाचा ठसा
◻️ प्रतापपूर सह पंचक्रोशीतून भगवानराव इलग यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
संगमनेर LIVE | राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक असलेले संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथिल जेष्ठ नेते व शिवनेरी उद्योग समुहाचे संस्थापक भगवानराव इलग यांनी समाजासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात त्याना उपस्थित मान्यवरांच्या हस्तें ‘ समाजभूषण पुरस्कार ’ देऊन गौरविण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे येथे नुकताच वंजारी सेवा संघ दशकपूर्ती सोहळा व संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र वंजारी समाज महामेळावा पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार गोविंदराव केंद्रे होते. येवल्याचे आमदार नरेंद्र दराडे, युवा नेते उदय सांगळे, नाशिक जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शितलताई सांगळे, हभंप तुळशीराम महाराज लुटे, हभंप राधाबाई सानप, नाशिक जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जगन्नाथ भाबड, नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोकराव मुर्तडक, सिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, बीडचे दादासाहेब मुंडे, हंगेवाडीचे सरपंच नितिन सांगळे, शेडगाव येथील शांताराम फंड आदिसह संपुर्ण वंजारी उत्कर्ष मंडळ यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगर, नाशिक व इतर जिल्ह्यातून समाजबांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
जेष्ठ नेते भगवानराव इलग यांचे समाजाप्रती नाते नेहमी घट्ट राहिले असल्याने समाजातील धार्मिक, कृषी, शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात आपल्या चतुरस्त्र कामाचा ठसा उमटवला आहे. यावेळी समाजातील अनेकांना त्यानी रोजगार, उद्योग, शिक्षण मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलत असताना समाजकारणा बरोबरचं राजकारणातातही विविध पदांवर समाजातील तरुणांना त्यानी संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यांच्या यांचं कामची दखल घेऊन त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देत ‘समाजभूषण पुरस्कारा’ने गौरवण्यात आले आहे.
दरम्यान भगवानराव इलग याना पुरस्कार मिळाल्याबद्दल हभंप रामराव महाराज ढोक, महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र विखे पाटील, जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर, कारखान्याचे संचालक कैलास तांबे, जेष्ठ नेते विनायकराव बालोटे, भाऊसाहेब जऱ्हाड,
रामभाऊ भुसाळ, माजी सनदी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, रिपाइंचे नेते बाळासाहेब गायकवाड, माजी सभापती अंकुश कांगणे, माजी जिल्हापरिषद सदस्या रोहीनीताई किशोर निघते, कांचनताई मांढरे, माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, अनिल भोसले, रावसाहेब घुगे, अशोक तळेकर, भारतराव गिते, सुरेश नांगरे, शिवाजीराव इलग, जितेंद्र इलग,
तसेच प्रतापपूर येथिल सेवा सोसायटीचे चेअरमन गजानन आव्हाड, व्हा. चेअरमन सखाराम आंधळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब सांगळे, सरपंच दत्तात्रय आंधळे, उपसरपंच शोभा आंधळे, पोलीस पाटील विठ्ठलराव आंधळे, उद्योजक ज्ञानेश्वर आंधळे, श्रीधर आंधळे, सुनील नांगरे, बाळू सांगळे, शंकर खामकर, अजय आंधळे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.