रोटरी तर्फे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना २०२३ चा ‘हेल्थकेअर लीडरशिप पुरस्कार’

संगमनेर Live
0
◻️ राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत अहमदनगर येथे पुरस्काराचे वितरण

संगमनेर LIVE (नगर) | १ जुलै, २०२३ रोजी “राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या" औचित्याने अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये 'रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल' च्या वतीने नामवंत "हेल्थकेअर लीडरशिप पुरस्कार" अहमदनगर दक्षिणेचे खासदार आणि न्यूरोसर्जन डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पहिले अवयव प्रत्यारोपण केंद्र सुरू करून मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेली ही महागडी सुविधा अहमदनगर सारख्या शहरांमध्ये गोर-गरिबांना परवडेल अशा दरामध्ये उपलब्ध करून दिली. त्यामुळे आतापर्यंत ९ जिवंत व्यक्तीमध्ये तर २ मेंदू मृत रुग्णांमध्ये अवयव दानाच्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पडून अनेक जणांना जीवनदान मिळाले आहे. याशिवाय २०० खाटाचे 'डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर' यशस्वीरित्या चालवून अनेक जणांचे जीव वाचविले आहेत. 

केंद्र शासनाची वयोवृद्ध रुग्णासाठी असलेली 'राष्ट्रीय वयोश्री योजना राबविताना लाभार्थ्याच्या संख्येमध्ये उच्चांक गाठल्याबद्दल देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे विशेष प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. त्याशिवाय हृदयरोग-शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, कर्करोग, सांधे बदल, मेंदू व मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रिया अशा अनेक अति विशिष्ट आरोग्य सुविधा मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये गोर-गरिबांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्याशिवाय असंख्य हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून विविध आरोग्य सेवा जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील त्यांनी केलं आहे. 

आरोग्य सुविधेचा स्तर उंचाविण्यासाठी त्यांनी यशस्वी 'नेतृत्व' दखल घेऊन त्यांना २०२३ चा 'हेल्थकेअर लीडरशिप अवॉर्ड' प्रदान करण्यात आला आहे.

तसेच डॉ. अभिजीत दिवटे, वैद्यकीय संचालक, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन यांना २०२३ चा "हेल्थकेअर एक्सलन्स पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. डॉ. दिवटे यांनी आरोग्य सेवेतील 'मनुष्यबळ' आणि आरोग्य सुविधांचा 'दर्जा' वाढविण्यासाठी केलेल्या 'उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना सदरचा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, नाशिक' द्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये 'नाशिक' विभागातील सर्वोत्तम मेडिकल कॉलेजचे पुरस्कार मिळवून अहमदनगरचे बहुमान वाढविले आहे.

तर डॉ. सुनील म्हस्के, अधिष्ठाता, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांना ‘वैद्यकीय शिक्षण व सर्वांगीण आरोग्य सुविधा प्रभावीपणे राबविल्याबद्दल "सर्वोत्तम प्रशासक" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नामवंत डॉक्टरांचा देखील सत्कार करण्यात आला. त्यामध्ये डॉ. विनोद चिंधे-कार्डियाक सर्जन, डॉ. ओंकार थोपटे कार्डिओलॉजिस्ट, डॉ. साईप्रसाद शिंदे व डॉ. शरद गारुडकर-नेफरोलॉजिस्ट, डॉ. अभिजीत आवारी, डॉ. अवनी कुमार श्रीवास्तव, डॉ. विजय पाटील, डॉ. सतीश मोरे इत्यादींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण 'रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल' चे नवनिर्वाचित अध्यक्ष हरीश नय्यर यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित सचिव डॉ. कुणाल कोल्हे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबच्या अनेक सदस्याने खूप मेहनत घेतली.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !