प्रवरेच्या अभियांत्रिकी सिव्हील इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थाचे तांत्रिक स्पर्धा परीक्षेत यश

संगमनेर Live
0

प्रवरेच्या अभियांत्रिकी सिव्हील इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थाचे तांत्रिक स्पर्धा परीक्षेत यश

◻️ वर्षभरात वीसहून अधिक मुलांना सरकारी नोकरी

संगमनेर LlVE (लोणी) | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाच्या अश्मिली जाधव सहाय्यक नगर नियोजक (ग्रेड-१), समिक्षा भुसाळ भूमी अभिलेख विभाग, निशांत लहाने सहाय्यक अभियंता, जलसंपदा विभाग, शितल निर्मल सहाय्यक अभियंता, जलसंपदा विभाग, मयूर गायकर सहाय्यक अभियंता, जलसंपदा विभाग, सारंग तोडकर भारतीय रेल्वे विभाग, रुषिकेश घोगरे सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जालिंदर गलांडे भूमी अभिलेख विभाग, अमोल विघ्ने जलसंपदा विभाग व बीएमसी, मुंबई, महेंद्र सुर्यवंशी भारतीय रेल्वे विभाग, पूजा गुरुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मृद व जलसंधारण विभाग, अंजली चव्हाण बीएमसी  मुंबई, प्राजक्ता जगताप बँक ऑफ इंडिया, चैतन्य आव्हाड भारतीय आर्मी, गणेश वारंघुसे भूमी अभिलेख विभाग, निलेश चांडे नगर परिषद, शिर्डी, शुभम लेंडे एमएमआरडीए मुंबई, स्वाती गावित सहाय्यक नगर नियोजक, ऐश्वर्या सोनवणे म्हाडा महाराष्ट्र शासन या विद्यार्थांची अश्या विविध सरकारी उच्च पदांवर स्पर्धा परीक्षांमधून निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली. 

सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे  ट्रेनिंग व प्लेसमेंटचे अधिकारी प्रा. लक्ष्मण लहामगे यांनी पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की, सिव्हील इंजिनिअरिंग विभागाने इंडस्ट्रीजची गरज ओळखून, महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरिंग विभागाने विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीजमध्ये लागणारे तंत्रज्ञानात पारंगत केल्यामुळे २० हून अधिक विद्यार्थांची विविध सरकारी उच्च पदांवर स्पर्धा परीक्षांमधून निवड झाली आहे. 

तर या वर्षी शिकत असलेल्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील ४२ हून अधिक विद्यार्थांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. विभागाकडे पीएचडी. झालेले वरिष्ठ तज्ञ व अनुभवी प्राध्यापक आहेत. हा विभाग त्यांच्या चार वर्षांच्या अभ्यासादरम्यान उद्योग गरजेवर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देतो. 

विभाग मूल्यवर्धन कार्यक्रम, अल्पकालीन अभ्यासक्रम आणि प्रगत तंत्रज्ञानातील विविध प्रशिक्षण कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय बूट कॅम्प आणि कार्यशाळा, प्री-प्लेसमेंट चर्चा, विविध नामांकित संस्थांना औद्योगिक भेटी आयोजित करतो. विभाग शैक्षणिक वर्षात विविध तांत्रिक कार्यक्रम, सांस्कृतिक आणि खेळांचे आयोजन या सारख्या उपक्रमातून विद्यार्थी परिपुर्ण होत असतो.

सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रमोद कोळसे यांनी सांगितले की, यांनी सांगितले की, सध्याच्या जगात विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही सिव्हिल इंजिनीअरिंग सॉफ्टवेअर कोर्स, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, ॲप्टीट्युड ट्रेनिंग घेत यांचा मोठा फायदा मुलांना होतो.

दरम्यान सिव्हील इंजिनिअरिंग विभागाने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, प्रा. मनोड परजणे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे, सर्व विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.

मी राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी असून माझी भूमी अभिलेख विभागात महाराष्ट्र शासन मध्ये स्पर्धा परीक्षांमधून निवड मिळाल्याने मला आनंद होत आहे. सिव्हील इंजिनीरिंग विभागाद्वारे प्रदान केलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या गुणवत्तेचा हा पुरावा आहे. विभागातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापक यांनी  माझ्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या प्रवरा स्पर्धा परिक्षा केंद्राचा देखिल मोठा फायदा झाला असल्याची भावना जालिंदर गलांडे यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !