संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व स्थानिक डॉक्टरांच्या सहभागाने उद्या रविवार दि. ९ जुलै २०२३ रोजी हनुमान मंदिर सभागृहात सकाळी १० ते १ वाजे दरम्यान मोफत आरोग्य तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मोफत डायलिसिस, कॅन्सरवरील केमोथेरपी, ह्रदयांची आॅजिओपलास्टी, पोटाचे विकार, अस्थिरोग विकार, मेंदू विकार, मुत्रपिंड विकार आदिं आजाराची मोफत तपासणी व निदान केले जाणार असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत १.५ लाखांपर्यंतच्या मोफत वैद्यकीय सेवांची उपस्थिताना माहिती दिली जाणार आहे.
या शिबिरावेळी डॉ. अशोक सोनांबेकर, डॉ. अजिंक्य सोनांबेकर, डॉ. अर्चना सोनांबेकर, डॉ. अमोघ काळे, डॉ. अभिजित कोरडे, डॉ. प्रकाश उगले, डॉ. मंगेश कोरडे, डॉ. अनिल जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ आश्वी खुर्द गावातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.