◻️ डॉ. प्रदीप दिघे यांची माहिती
संगमनेर LIVE (लोणी) | लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्यश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील सहा विद्यार्थ्यांची फार्मासिटिकल कंपनीमध्ये निवड झाली असून या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे वेतनही कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.
महाविद्यालयाच्या यशामध्ये सातत्याने कॅम्पस मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होऊन एक मानाचा तुरा रोवला जातो आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाविद्यालयातील ७६९ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांनी व बँकांनी महाविद्यालयात येऊन प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या व त्यातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या पुणे, मुंबई, नागपूर, बेंगलोर हैदराबाद, चेन्नई अशा नामांकित शहरांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी यामुळे उपलब्ध झाली.
आयटी क्षेत्रामध्येही संगणक शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी विप्रो सारख्या कंपनी रोजगाराचे संधी प्राप्त केली या सर्व विद्यार्थ्यांना ज्या काही रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत त्या पाठीमागे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची दूरदृष्टी आणि सातत्याने विविध कंपन्यांना महाविद्यालयात मुलाखतींसाठी आमंत्रित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याची तळमळ अधोरेखित होताना दिसते नुकत्याच मेक्लाइड या कंपनीमध्ये सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
दरम्यान या यशस्वी विद्यार्थ्याचे महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिक विभागाचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, प्रा. राजेश परजणे यांच्यासह रसायनशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. गजानन पांढरे, डॉ. हरिभाऊ दुबे, डॉ. बबन आमले, प्लेसमेंट सेलचे प्रा. मनोज परजणे, प्र. आप्पासाहेब शेळके आदींनी या विद्यार्थ्यांचा गौरव केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.