संगमनेर LlVE (लोणी) | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलने १७ वर्षांखालील वयोगटात जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत अहमदनगरच्या आर्मी पब्लिक स्कूलचा ४-३ अशा फरकाने पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला व शाळेच्या संघाची विभागीय पातळीसाठी निवड झाली. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. बी. बी अंबाडे यांनी दिली.
जिल्हा पातळीवर झालेल्या या स्पर्धेत एकूण २० संघांनी आपला सहभाग नोंदवला. अहमदनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम सामना अतिशय उत्कंठावर्धक अवस्थेत पोहोचला होता. अखेर प्रवरा पब्लिक स्कूलने चिकाटीने व कसोशीने खेळ उंचावत विजय मिळवला व जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन केले.
प्रवरा पब्लिक स्कूलने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, इंग्लिश विभागाच्या संचालिका डाॅ. सुश्मिता विखे पाटील, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, शिक्षण समन्वयच प्रा. नंदकुमार दळे, क्रिडा संचालक डाॅ. प्रमोद विखे यांनी विजेत्या संघाचे विशेष अभिनंदन केले.
दरम्यान शाळेचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे, उपप्राचार्य के. टी. अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम. एस जगधने, सौ. शुभांगी रत्नपारखी यांनी कौतुक केले. तसेच क्रीडाशिक्षक डी. के. जाधव, अफजल पटेल, अवनीत सिंग यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.