◻️निसर्ग सहलीबरोबरचं वनभोजनाचा चिमुकल्यानी घेतला आनंद
संगमनेर LIVE | नवीन शैक्षणिक धोरणात प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षणास महत्त्व देण्यात आले आहे. बंद वर्ग खोल्यांमधील शिक्षण आणि घोकंपट्टी यावर अवलंबून न राहता विद्यार्थ्याना परिसर ज्ञान व निरिक्षणातून विविध घटकांची ओळख व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथिल जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका विजया भुसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक रामराव देशमुख, वैशाली पाबळ व समिधा बागवान या शिक्षकांनी क्षेत्रभेटीचे नियोजन केले होते. यावेळी शाळेतील चिमुकल्याना बरोबर घेऊन त्यांनी ओझर येथील जगूमाता मंदिराला क्षेत्रभेट दिली आहे.
यावेळी चिमुकले उंबरी ते ओझर दरम्यान निसर्ग सहलीचा आनंद घेत असताना त्यांना विविध वृक्ष, पाणी, हवा, प्रदुषण, वनौषधी आदि विषयाची माहिती शिक्षकांनी दिली व पर्यावरणाविषयी विद्यार्थ्याच्या मनात जागृता निर्माण व्हावी यासाठी विशेष मार्गदर्शन देखिल केले आहे.
जगूमाता मंदिर परिसरात गेल्यानंतर विद्यार्थ्यानचा उत्साह चांगलाच वाढला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यानी मंदिराजवळील निसर्ग व पशु तसेच पक्षाचे निरीक्षण केले. त्यानतंर वनभोजनाचा सुरवात करण्यात आली असता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत भुसाळ, पंकज महानुभव, योगेश डोखे, निलेश वाघमारे यांनी विद्यार्थ्याना केळी, शेंगदाणा चिक्की, सोनपापडीचे तसेच संजय बर्डे व पोपट बिडवे यांनी विद्यार्थ्याना भेळीचे तर उमेश थोरात यांनी बिस्किटे अशा विविध खाऊचे वाटप केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनचा आनंद द्विगुणित झाल्याचे भाव विद्यार्थ्यानच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.
दरम्यान जिल्हापरिषद शाळेने विद्यार्थ्याना क्षेत्र भेटीच्या माध्यमातून प्रत्यक्ष निसर्गाची सहल घडवून आणत परिसरातील विविध गोष्टीचे ज्ञान अनुभवातुन शिकण्याची संधी उपलब्ध करुण दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व सर्व ग्रामस्थांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांचे या उपक्रमासाठी अभिनंदन केले आहे.