◻️ ग्रामीण पातळीवरील सर्वोत्तम महाविद्यालय म्हणून गौरव
◻️ प्राचार्य डाॅ. हरीभाऊ आहेर यांची माहिती
संगमनेर LlVE (कोल्हार) | दर्जेदार शिक्षणासोबतचं आदर्श नागरीक घडविण्यात प्रवरा शैक्षणिक संकुल हे अव्वल स्थानावर आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरचं विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमातून आदर्श नागरीक घडविण्याचे काम कोल्हार महाविद्यालयात होत असून दुसऱ्यांदा नॅक नामांकनासाठी कोल्हार येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास नॅक पुनर्मुल्यांकनात ए.प्लस.प्लस ग्रेड शी. जी. पी. ३ -५४ मिळून महाविद्यालय ग्रामीण भागातील देशात आणि महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानावर पोहचले. अशी माहीती प्राचार्य डाॅ. हरीभाऊ आहेर यांनी दिली.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, कोल्हार राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद बंगलोरच्या टिमने २० व २१ जुलै २०२३ रोजी भेट दिली होती. १९९९ मध्ये सुरु झालेल्या या महाविद्यालयात ग्रामीण भागातील ५६० विद्यार्थी पदवीसह पदवीत्तर शिक्षण घेत आहे.
महाविद्यालयामध्ये पायाभूत सर्व सेवा-सुविधा बरोबरचं मुलीसाठी सुरक्षित कॅम्पस म्हणून प्रवरेची वेगळी ओळख आहे. कौशल्य विकास केंद्र,नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघ, उच्च शिक्षीत प्राध्यापक, सौर ऊर्जाचा वापर, पर्यावरण पुरक परिसर, प्लेसेंमेट विभाग शिवाय शासकीय शिष्यवृत्ती बरोबरचं गरीब विद्यार्थी सहाय्य निधी योजना, कमवा व शिका योजना, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, पोलिस आर्मी प्रशिक्षण केंद्र या सुविधा बरोबरच अभ्यासपूरक उपक्रम, विद्यार्थी शिक्षक दत्तक गाव योजना, करीयर कट्टा, विद्यार्थी आरोग्य विमा, महीला सक्षमीकरण, लघु संशोधन प्रकल्प याद्वारे विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यावर भर असतो.
महाविद्यालयातून २४८ विद्यार्थ्याना प्लैसमेंट देण्यात आली असून विविध कंपन्याशी २४ शैक्षणिक करार करण्यात करण्यात आले आहेत. परिसंवाद, चर्चासञ,कार्यशाळा आणि प्रक्षेञ भेटीतून करीअर मार्गदर्शन होत असते.या सर्वाची दखल घेत महाविद्यालयास ए.प्लस.प्लस. ग्रेड प्राप्त झाली आहे. उपप्राचार्य डाॅ. सोपानराव शिंगोटे, डाॅ. प्रकाश पुलाटे, डाॅ. प्रतिभा कानवडे, नॅक समन्वयक प्रा. परमेश्वर विखे आणि सर्व प्राध्यपक आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा बॅकेचे संचालक डाॅ. भास्करराव खर्डे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्वच महाविद्यालयास नॅक नामाकंन प्राप्त झाले आहे. मुलींच्या शिक्षणात कोल्हार महाविद्यालय हे अग्रेसर असून या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला चालना देण्याबरोबरचं शेतकऱ्यांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्याने नोकरी स्वयंरोजगार आणि शेतीच्या नव्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने फायदा होत आहे. महाविद्यालयास देश पातळीवरील पर्यावरण संवर्धनातील सर्वोत्कृष्ट विस्तार उपक्रम हा पुरस्कार देखील प्राप्त आहे.