◻️ अभियांत्रिकी महाविद्यालयात महसूल सप्ताहनिमित्त युवासंवाद कार्यक्रम
संगमनेर LlVE (लोणी) | महसूलचे विविध दाखले काढणे आता ऑनलाईनद्वारे सुलभ झाले आहे. लोकशाही भक्कम होण्यासाठी सर्वानी मतदार नोंदणीसह मतदान करुन लोकशाही भक्कम करावी युवा पिढी देशाचे भविष्य आहे युवकांनी शासकिय योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन राहात्याचे पुरवठा अधिकारी भारत खरात यांनी केले.
शासनाच्या वतीने महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ ते ७ ऑगस्ट हा महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात होत आहे. त्या निमित्ताने प्रवरा ग्रामीण अभियांञिकी महाविद्यालयात राहता तहसील कार्यालयातर्फे 'युवासंवाद ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातील युवतींना मतदान नोंदणी, महसूल विभागाच्या विविध योजना तसेच विविध कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया जसे उत्त्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर, अधिवास दाखला, विविध दाखल्यांची माहिती भारत खरात यांनी दिली.
दरम्यान या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संजय गुल्हाने, हसनापूरचे तलाठी भाऊसाहेब कानडे, सत्यवाण मेहेरे, बालाजी भोसले, प्रा. हमीद अन्सारी उपस्थित होते. तर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.