लोकशाहीची मूल्ये व स्वातंत्र्याची प्राणपणाने जपवणूक करावी - मा. आ. डॉ. तांबे
◻️भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा
संगमनेर LIVE | लोकशाहीची मूल्ये व स्वातंत्र्याची प्राणप्रणाने जपवणूक करून, एकसंघ समाज निर्मितीसाठी स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मूल्यांचा नागरिकांनी स्वीकार करून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याची जाणीव कणाकणात आणि रोमारोमात बाळगून देशभक्ती समजून घ्यावी. जगात अनेक राज्यक्रांत्या व स्वातंत्र्ययुद्धे झाली, मात्र गरीब - श्रीमंत, धर्म - जात, श्रेष्ठ - कनिष्ठ, विरहित भारतीयांची ओळख जगात झाली, विषमतेला दूर करत सर्वांना समानसंधी, समान अधिकार हा संस्काराचा भाग ठरुन जगात आपला देश गौरवास पात्र ठरला.
भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय, भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्गदर्शन करतांना सह्याद्री शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि नाशिक पदवीधर विभागाचे मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांना अवाहन केले.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या एन. सी. सी कॅडेटच्या वतीने संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिर यांच्यावतीने योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सह्याद्री विद्यालय, जुनिअर कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी सौ. स्वाती आवटे यांच्यावतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांना निपुण प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमास सह्याद्री शिक्षण संस्थेचे सहसेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, सह्याद्री संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आणि दैनिक युवावार्ताचे संपादक किसनभाऊ हासे, बी.एस.टी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. गणेश गुंजाळ, माजी प्राचार्य विठ्ठल फटांगरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य के. जी. खेमनर, उपप्राचार्य जी. एम. डोखे, सह्याद्री प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नम्रता पवार,
उपमुख्याध्यापिका श्रीमती बुरकुल मॅडम, पर्यवेक्षक भाऊसाहेब सानप, प्रताप आहेर, अशोक गिते, जुनिअर कॉलेज शिक्षक प्रतिनिधी प्रा. संतोष थोरात, प्रा. चित्रा कुलकर्णी, माध्यमिकचे शिक्षक प्रतिनिधी अण्णासाहेब दिघे, श्रीमती सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक प्रा. भारत शिंदे प्रा. प्रमोद खैरे व मिलिंद औटी, सुदाम आव्हाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक वृंद,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नवनाथ गुंड यांनी केले तर आभार प्राचार्य के. जी. खेमनर यांनी मानले.