अहंकार वाढला की सर्वनाश होतो - इंदुरीकर महाराज

संगमनेर Live
0
◻️ स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहची कल्याच्या किर्तनाने सांगता

◻️ तुमचे कोणतेही प्रश्न असो, त्या सर्वांचे उत्तर हरिपाठामध्ये हरिपाठ केला तर त्यातून तुम्हाला देव भेटेल

संगमनेर LIVE | ज्याच्याकडे संपत्ती आहे, त्याचकडे प्रेम, आपुलकी व दया कमी होते आणि त्यातून अहंकार वाढतो आणि अहंकार वाढला की त्याचा सर्वनाश झाल्या शिवाय राहत नसल्याचे परखड मत समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशुमुख (इंदोरीकर) यांनी व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे सुरू असणाऱ्या गगनगिरी महाराज अखंड हरि नाम सप्ताहाची सांगता समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यावेळी आयोजित किर्तनात ते बोलत होते. यावेळी ठाणापती विष्णुपरी महाराज, शंकरानंदगिरी महाराज, सरदार संजय पाटणकर, शिवजीराव पाटणकर, चंद्रकांत पाटणकर, रोहित पाटणकर, शनीदेव महाराज खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. सत्यजित तांबे, माजी. खा. भाऊसाहेब वाकचौरे, रणजित देशमुख, जालिंदर वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, अजय फटांगरे, प्रवेक्षधिन पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, कपिल पवार, अशोक कानवडे, नानासाहेब दिघे, रामहारी कातोरे, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, उपाध्यक्ष संजयगिरी महाराज देशमुख, बाळासाहेब ताजने,  सागर वाकळे, किरण घोटेकर, सुभाष राहणे, सागर वाकचौरे, प्रमोद देशमुख बाळासाहेब पानसरे, किसन पानसरे नितीन पानसरे, राजेंद्र देशमुख, विजय पानसरे आदि उपस्थित होते.

इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर आहे, कळस संत तुकाराम महाराज आहे, इमारत संत नामदेव आहे तर, भिंत एकनाथ महाराज आहेत. एवढे महत्त्व वारकरी संप्रदायात संतांना आहे. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सप्ताह हा देवाची विभूती आहे. त्यामुळे या सप्त्यात तुम्ही जेवढे पुण्य कराल तेवढे पुण्य इतर कुठे मिळणार नाही. पुस्तकी ज्ञानाचा उपयोग फक्त संसरासाठी होतो. तुम्ही किती ही शिका, तुम्ही अज्ञानी असेल तर तुम्ही  कुणाचेही गुलामच व्हाल असे त्यांनी सांगितले.

आपल्याला कुठलेच ज्ञान नाही. आपण स्वतःला ज्ञानी समजतो, अक्कल शिकवते मंदिरावर कळस चढाला की मंदिर पूर्ण होते, पण सागराला मिळाले तर नदी पूर्ण होईल. अठरा अध्याय ज्ञानेशवरीचा कळस आहे. आठरावा अध्याय वाचला की ज्ञानेश्वरी वाचली असे होते. अष्टांग योग शिकले तरी देव भेटणार नाही मात्र सर्वसमाश्यांचे मूळ आणि तुमचे कोणतेही प्रश्न असो त्या सर्वांचे उत्तर हरिपाठामध्ये आहे. हरिपाठ केला तर त्यातून तुम्हाला देव भेटेल. त्यासाठी देवाचे कायम नामस्मरण करा, दान धर्म करा. दानधर्म करायला पैसा घामाचा असावा लागतो, तो हरामचा नसावा. 

पण गगनगिरी महाराजांचा सप्ताहाचा काला संपल्यानंतर पाऊस आल्याशिवाय राहणार नाही. संसार नावाचे झाड वांझआहे. त्याला अज्ञान झाले तर अहंकार होतो, मी हे केले ते केले असे कधीच सांगू नका तू तर काहीच केले नाही तर तुमच्याकडून हे काम देवाने करून घेतले असल्याचे सांगितले. हा सप्ताह जाखुरीकरांनी केला असे नाही तर हे काम गगनगिरी महाराज यांनी करून घेतले. सप्ताहात कौतुक करू नका सर्वात पाहिले कौतुक वाढणाऱ्याचे करा आमच्यासारख्या भामटय्यांचे अजिबात कौतुक करू नका. थोडा अहमपणा आला तर अहंकार झाल्याशिवाय राहत नाही. गगणगिरी महाराजांकडे विरक्ती होती. ज्ञान होते. म्हणून ते तुमचे आमचे आई नाही वडील नाही तर ते मायबाप आहेत.

हा सप्ताह मी केला असे कधीही म्हणू नका गगनगिरी महाराजांनी सर्व अहंकार दूर केला म्हणून ते विश्वविभूषित झाले. शास्त्रकृपा, गुरूकृपा, ईश्वरकृपा, अंतःकरण एवढ्या कृपा गगनगिरी महाराजांच्या अंगी होत्या म्हणूनच ते संत झाले. अस ल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्रंबकेश्वर येथील जुन्या आखड्याचे ठाणापती विष्णुपुरी महाराज, शिवानंदगिरी महाराज, खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. दहीहंडी फोडण्याचा मान निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी गगनगिरी महाराजांचे भक्त कपिल पवार यांना दिला. उपस्थितांचे स्वागत सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन पोपट महाराज आगलावे यांनी केले तर आभार संजय महाराज देशमुख यांनी मानले.

संजय देशमुख नव्हे तर संजय गिरी महाराज..

संगमनेर तालुक्यातील पिपरणे येथील  गगनगिरी महाराजांसाठी सर्वस्वी वाहून घेतलेले परमभक्त संजय महाराज देशमुख या नावाने न संबोधता त्यांना इथून पुढे संजयगिरी महाराज या नावाने संबोधले जाईल अशी घोषणा त्रिंबकेश्वर येथील जुन्या आखाड्याचे ठाणापती विष्णूगिरी महाराज आणि शकरांनंदगिरी महाराज यांनी स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सांगता प्रसंगी जाखुरीत केली.

बातमी सौजन्य:- पत्रकार गोरक्ष नेहे

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !