महात्मा गांधी व महात्मा फुले यांचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

संगमनेर Live
0

◻️ जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन


संगमनेर LlVE (अहमदनगर) | शिवप्रतिष्ठेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा फुले, महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत  बेताल वक्तव्य करून त्यांचा घोर अपमान केला त्यामुळे समस्त देशवासीयांची मने दुखावली आहेत. त्यांच्या त्या वक्तव्याचा अहमदनगर मधील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
 
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अहमदनगर शहराशी व अहमदनगर मधील मुस्लिम समाजाचे खूप निकटचा संबंध होता त्या वेळच्या अमेरिकन मिशन गर्ल्स हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले प्रशिक्षण करतेवेळी त्यांना फातिमा शेख यांच्याबरोबर मुस्लिम मुलींना शिक्षणाकरिता प्रयत्नांची पराकाष्टा करून त्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अशा कार्यामुळे असंख्य मुस्लिम मुली शिक्षणाकडे आकर्षित झाल्या. नगर बरोबरच त्यांनी पूर्ण व राज्यातील अनेक जिल्ह्यात उपेक्षित महिलांच्या शिक्षणाकरिता मोठे कार्य केले अशा या थोर राष्ट्रभक्त महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान कोणीही व कदापी सहन करणार नाही.
 
सय्यद खालील अब्दुल करीम यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले त्यांच्या समवेत निवृत्त अध्यापक अब्दुल कादिर, मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अब्दुल सलाम अजीज, शेख नसीर अब्दुल्ला, सलीम जरीवाला, पत्रकार रियाज शेख, सलीम रेडियम वाला, निसार बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याची नोंद साऱ्या जगाने घेतली असून अनेक देशात त्यांचे पुतळे उभारले जात आहेत. त्यांच्यावर शोध ग्रंथ निघत असताना आपल्या देशातील तथाकथित गुरुजी महात्मा गांधी बद्दल बेताल वक्तव्य करून देशातील वातावरण बिघडवीत आहे. त्या गुरुजींचे महाराष्ट्राचे मनिपुर करण्याचे प्रयोजन तर नव्हे ना अशी शंका येत आहे.

अशा या नथुराम गोडसे विचारधारेला वेळीच लगाम घालने गरजेचे असून संभाजी भिडे यांना त्वरित अटक करून त्याच्याविरुद्ध कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज सर्वत्र भिडेंच्या विरुद्ध रान उठले असताना त्यांच्या सभेला परवानगी कसे मिळणे हे न समजण्याजोगे आहे. भाजपाचा संबंध नाही असे एकीकडे म्हटले जाते पण, दुसरीकडे उठ सूट रोज हा महाभाग सर्वच महापुरुषांच्या विरोधात नाही ते वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !