◻️ पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याच्या चेअरमन पदी कैलास तांबे यांची निवड झाल्याबद्दल प्रतापपूर ग्रामस्थांकडून सत्कार
◻️ जेष्ठ नेते भगवानराव इलग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराने कैलास तांबे भारावले
संगमनेर LlVE | शिर्डी विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विश्वासाने आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी काम करण्याची संधी दिली. त्याचबरोबर ऊस दर नियंत्रण मंडळावर सदस्य म्हणून निवड केली आहे. विखे पाटील कुटुंबाने दिलेल्या या संधीचा लाभ कारखाना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळून देण्यासाठी आपण ना. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करु. असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन कैलास तांबे यांनी केले आहे.
पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याच्या चेअरमन पदी कैलास तांबे यांची निवड झाल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर ग्रामस्थांकडून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कैलास तांबे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दगडू पाटील आंधळे होते. जेष्ठ नेते भगवानराव इलग, सरपंच दत्तात्रय आंधळे, उपसरपंच शोभा आंधळे, सेवा सोसायटीचे चेअरमन गजानन आव्हाड, व्हा. चेअरमन सखाराम आंधळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब सांगळे, पोलीस पाटील विठ्ठल आंधळे, ट्रक वाहतूक सेवा सोसायटीचे संचालक शिवाजीराव इलग, ग्रामसेवक राशीनकर, सचिव उनवणे, सुकदेव आंधळे, प्रा. गिते, शिवराम आंधळे, हरिभाऊ आंधळे, भीमाशंकर आंधळे, जनार्धन फड, बबन घुगे, कचेश्वर आंधळे, एकनाथ सांगळे, सहादू आंधळे, दादा आंधळे, हरी दराडी, अशोक बिडवे, शंकर खामकर, पांडुरंग आंधळे, अजय आंधळे, कैलास आंधळे, संदीप नागरे, गणेश आंधळे, राजेंद्र वाणी आदि यावेळी उपस्थित होते.
कैलास तांबे यांनी पुढे बोलताना सांगितले की, २००५ साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरवात केली. यानंतर चिचंपूर गावचे सरपंच पद, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक पद, संंगमनेर पंचायत समिती सदस्य पद, अहमदनगर जिल्हा आत्मा समिती सदस्य पद, पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक पद व व्हा. चेअरमन पद, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक पद, दुधेश्वर उपसा जलसिंचन योजना चिचंपूर चेअरमन पदी काम करण्याची संधी ना. विखे पाटील यांच्या मुळेचं मिळाली.
राज्य शासनाकडून नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या राज्यपातळीवरील ऊस दर नियंत्रण समितीत साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून माझा समावेश करण्यात आला आहे. तर आता आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ना. विखे पाटील व विखे पाटील कुटुंबाने दिलेल्या संधीच्या माध्यमातून कारखाना चांगल्या पध्दतीने चालवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कैलास तांबे यांनी दिली.
यावेळी जेष्ठ नेते भगवानराव इलग मार्गदर्शन करताना म्हणाले की, हभंप रामराव महाराज ढोक, उध्दव महाराज मंडलिक व वारकरी संप्रदायाच्या केलेल्या सेवेचे फळ कैलास तांबे यांना मिळाले असून शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल त्यांनी ना. विखे पाटील यांचे आभार मानले.
यावेळी जेष्ठ पत्रकार सीताराम चांडे, संजय गायकवाड, रविंद्र बालोटे, योगेश रातडीया, अनिल शेळके, गंगा म्हस्के यांच्यासह प्रतापूर ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व पदाधिकारी यांनी देखिल कैलास तांबे यांचा सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या संत्कारामुळे कैलास तांबे भारावले असल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले आहे.