◻️शेतकऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणुन
◻️ प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून तक्रारीचा गावातील झाडाखाली बसून निपटारा
संगमनेर LIVE | महाराष्ट्र शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ या महत्वकांक्षी उपक्रमाची राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. लोणी येथे या संदर्भात झालेल्या बैठकीनंतर प्रांताधिकारी शैलेश हिंगे व तहसीलदार धीरज मांढरे यांनी नुकतीच संगमनेर तालुक्यातील चिचंपूर याठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यासह नागरीकाच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याबाबात संबंधित विभागाला सुचना दिल्या आहेत.
यावेळी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी अतिवृष्टीमुळे चिचंपूर गावातील ९५० शेतकऱ्याच्या वाया गेलेल्या पिकांचे पंचनामे केले असल्याची माहिती दिली. मात्र प्रत्यक्षात ६०० शेतकऱ्यांना अनुदान मंजुर झाले असल्याचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे उरलेल्या शेतकऱ्यांनमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याने या सर्व नूकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखिल अनुदान प्राप्त व्हावे यासाठी कारवाई करावी अशी मागणी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केल्यानंतर योग्य त्या कारवाईच्या सुचना प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी दिल्या आहेत.
तसेच यावेळी प्रांताधिकारी शैलेश हिंगे व तहसीलदार धीरज मांढरे यानी महसुल विभागाअंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, पंतप्रधान आवास योजना, दिव्यांग कल्याण योजना आदी बाबतची माहिती देऊन आलेल्या तक्रारारीचे गावातील मोकळ्या पटांगणात असलेल्या झाडाखाली सर्व सामान्य ग्रामस्थांनमध्ये बसून जागेवरचं निवारण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा सुखद अनुभव चिंचपूरच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.
दरम्यान याप्रसंगी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा बॅकेचे संचालक गिताराम तांबे, लक्ष्मण तांबे, श्रीरंग तांबे, नामदेव तांबे, हौशिराम तांबे, बाळासाहेब तांबे, पंढरीनाथ अनर्थे, निवृती तांबे, शंकर तांबे, शत्रुघ्न तांबे, विठ्ठल तांबे, गजाबा तांबे, संभाजी तांबे, गणपत तांबे, दत्तू तांबे, गिताराम पवार आदिसह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.