संगमनेरचे प्रांत आणि प्रवरेच्या आश्वी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार

संगमनेर Live
0
संगमनेर प्रांत आणि प्रवरेच्या आश्वी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार

◻️ ‘उन्नतीसाठी युवक हाच दुवा’ हा उपक्रम राबवला जाणार 

संगमनेर LIVE | महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन महसूल विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले होते. या सप्ताहाचे औचित्य साधून ‘उन्नतीसाठी युवक हाच दुवा’ या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील आश्वी येथिल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वणिज्य, विज्ञान व संगणक महाविद्यालय आणि प्रांत अधिकारी संगमनेर यांच्यात नुकताच जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्यात सामजस्य करार करण्यात आला. 

याप्रसंगी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, संगमनेर विभागाचे प्रांतअधिकारी शैलेश हिंगे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रा. देविदास दाभाडे समन्वयक म्हणून उपस्थित होते.

आश्वी येथिल कला, वणिज्य, विज्ञान व संगणक महाविद्यालय हे २००१ पासून महाराष्ट्रातील एक नामांकित व शैक्षणिक नेतृत्व करणारे महाविद्यालय आहे. उत्कृष्टतेचा व समाजविकासाचा ध्यास तसेच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचविणे हे ध्येय मानुन महाविद्यालय प्रारंभापासूनच काम करत आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास महाविद्यालय सतत प्राध्यान्य देत आले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील सर्वसामान्य व्यक्तींच्या विकासास हातभार लागतील असे उपक्रम महाविद्यालय वेळोवेळी घेत आलेले आहे. महाविद्यालय व्यवस्थापन, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नातून महाविद्यालयाचा लौकिक वाढत गेलेला आहे. विद्यार्थ्यांची कठोर मेहनत घेण्याची तयारी आणि जागरुक पालकांचा खंबीर पाठिबा याला कारणीभूत आहे. 

सध्या महाविद्यालयातून सुमारे ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्पर्धा परीक्षा विभागामार्फत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात भर पडत असून प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडवण्याचे काम महाविद्यालय करत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रशासन नेहमीच पुढाकार घेऊन लोकांच्या समस्या दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहे. कृषी व्यवस्थापन, महिला आरोग्य, व्यसनमुक्ती, हुंडा बंदी, एडस् जणजागृती, ई पेमेंट, आरोग्य सर्वेक्षण आदि याबाबत लोकामध्ये जाऊन जनजागृतीच्या माध्यमाने समाजाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करुन एक सशक्त समाज उभा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

या सामंजस्य करारानुसार महसूल विभागाच्या योजना विद्यार्थ्यामार्फत लोकांपर्यंत पोहचविणे. शासनाच्या वेळावेळी येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे, यामध्ये पिक पाहणी, ई हक्क प्रणाली, ई चावडी, सलोखा योजना, लक्ष्मी मुक्ती योजना सारखे उपक्रम तसेच लोक कल्याणकारी योजनांच्या प्रसार, प्रचार, प्रबोधन व अंमलबजावणी करणे. मतदार नोंदणी करणे गरजू व्यक्तींना विविध शासकीय दाखले प्रदान करून देणे. ही कामे विद्यार्थ्यांच्या मदतीने केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व दोन क्रेडीट देण्यात येणार आहे. 

दरम्यान महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदीप दिघे यांनी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे यांना शुभेच्छा देऊन महाविद्यालयीन उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !