पद्मश्री डॉ विखे पाटील यांचा जयंती दिन "शेतकरी दिन”म्हणून साजरा करण्यात येणार
◻️ शासन आदेश शासनाने निर्गमित
संगमनेर LIVE (शिर्डी) | सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंतीदिन यावर्षी ३० ऑगस्ट, २०२३ रोजी म्हणजेच नारळी पोर्णिमा दिनी राज्यात “शेतकरी दिन” म्हणून साजरा करण्यास येणार असून याबाबतचा शासन आदेश शासनाने निर्गमित केला आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ २९ ऑगस्ट हा दिवस "शेतकरी दिन” करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा म्हणून साजरा करण्यात येतो.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून यावर्षी सन २०२३ मध्ये दि. ३० ऑगस्ट, २०२३ या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषि आयुक्तालयाने निर्गमित करण्यात येणार आहेत. या दिवशी वेबिनार संवाद, मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येणार असल्याचे शासनाच्या परीपत्रकात म्हटले आहे.