◻️ डाॅ. चारुशिला भंगाळे यांची माहिती
संगमनेर LIVE (लोणी) | लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा फार्मसी महाविद्यालय (महिला) चिंचोली ता. सिन्नर येथील अंतिम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या (बी. फार्मसी) विद्यार्थिनींची मुंबई येथील कंपनीत चांगल्या वेतनावर निवड झाल्याची माहीती डाॅ. चारुशिला भंगाळे यांनी दिली.
या महाविद्यालयातील कु. साक्षी नरोडे यांना तीन लाखांचे तर कु. हर्षदा नवाळे येथे चांगल्या वेतनावर निवड झालेली आहे. या मुली चतुर्थ वर्षाच्या असून त्यांच्या निकालानंतर लगेचच रुजू होण्याची संधी कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे.
गुणवत्तापुर्ण शिक्षणांसोबतचं विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याबरोबरचं प्रवरेच्या माध्यमातून परिपुर्ण विद्यार्थी घडविणे हाच संस्थेचा उद्देश राहीला आहे. विविध करिअर मार्गदर्शन, माजी विद्यार्थीच्या माध्यमातून वेळोवेळी कार्यशाळा, विविध कंपन्याशी सामजस्य करार यामुळे विद्यार्थी देशातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर यशस्वीपणे कार्यरत आहेत असे डाॅ. भंगाळे यांनी सांगितले.
दरम्यान विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डाॅ. सुश्मिताताई विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी अभिनंदन केले आहे.