◻️ स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची धडाकेबाज कारवाई.
संगमनेर LIVE | पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
त्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ मनोहर सिताराम गोसावी, पोहेकॉ अतुल भानुदास लोटके, पोना गणेश प्रभाकर भिंगारदे, पोना ज्ञानेश्वर नामदेव शिंदे, पोना संदीप संजय दरंदले यांना अवैध धंद्याची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक श्रीरामपुर शहरात अवैध धंद्याची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदाराकडून श्रीरामपुर शहरातील नॉदर्न बँच, वार्ड नं ७, सदावते हॉस्पीटलचे मागे इसम नामे भरत संघवी हा त्याचे घराचे पाठीमागील पत्र्याचे खोलीमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू व सुपारी बेकायदेशिरपणे चोरुन विक्री करण्यासाठी ठेवत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला याबाबत माहिती कळवून कारवाई करणे बाबत योग्य त्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पथकाने नॉदर्न बँच, वार्ड नं ७, सदावतें हॉस्पीटलचे मागे जावून खात्री केली असता त्या ठिकाणी एक इसम मिळुन आला. त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव भरत संघवी (वय ४८ वर्ष रा. मोरगेवस्ती, श्रीरामपुर) असे असल्याचे सांगितले. यावेळी खपथकाने त्याचे घराजवळील त्याचे मालकीच्या बंद पत्र्याचे रुमची झडती घेता १ लाख ४३ हजार ७४८ रुपये किंमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला, ७ हजार ७४४ रुपये किंमतीचा व्ही १ तंबाखु चे एकुण ३५२ पुडे, १, लाख २,२४० रुपये किंमतीचा हिरा पानमसालाचे ८५२ पुडे, २६ हजार ५५० रु किंमतीची रॉयल ७१७ तंबाखुचे ८८५ पुडे, ६२०८० रु किं चा राजनिवास पानमसालाचे ४८५ पुडे, १, ५६० किं चे प्रिमीयम जेड एल ०१, जाफरानी जर्दा तंबाखु चे ५२ पुडे, १०५ रु किं चा गोवा गुटखा २४,६००/- रु किंचे रजनीगंधा पानमसाला कंपनीचे बॉक्स, १२० रु किंचा एम तंबाखु, ३६००० असा एकुण ४ लाख १४ हजार ६९२ रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला
तर ताब्यात घेतलेला इसम भरत संघवी (वय ४८, मोरगेवस्ती, श्रीरामपुर) हा एकुण ४ लाख १४, हजार ९२रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात विक्रीस व तयार करणेस बंदी असलेला विविध प्रकारचा पान मसाला, गुटखा, सुंगधी तंबाखु असे अवैध रित्या कब्जात बाळगतांना व विक्री करताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेलनला गु.र.नं. १२२/२०२३ भाविक ३२८, २७२, २७३, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जप्त मुद्देमाल व आरोपीस पुढील कारवाई कामी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवंत शिवपुजे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.