लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात ३४ वा विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन समितीचा मेळावा संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरेच्या शैक्षणिक कार्यामुळे ग्रामीण भागाचा विद्यार्थी हा उच्च शिक्षणातून पुढे जात आहे. शिक्षणातून अनुभव घेत पुढे जाताना संस्थेचा नावलौकीक वाढवा. परिपुर्ण विद्यार्थी घडविणे हाच ध्यास प्रवरेचा आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ३४ व्या विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन समितीच्या मेळाव्यात सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, संख्येचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी, डाॅ. लक्ष्मण अभंग, प्रथम वर्षाचे समन्वयक प्रा. अनिल लोंढे, प्रा. प्रदिप नळे आदीसह विभाग प्रमुख, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शन सौ. विखे पाटील म्हणाल्या शेतकरी, सामान्य जनतेच्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था सुरु केल्याने आज ग्रामीण भागाचा विद्यार्थी जागतिक पातळीवर पोहचला आहे. आज संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा परिक्षा, पोलिस, तलाठी भरती मार्गदर्शन, प्रवरा करीअर मार्गदर्शन त्यांचबरोबर दर्जेदार शिक्षणासोबतचं भरती मेळावा आणि प्लेसमेंट मार्गदर्शनामुळे ग्रामीण विद्यार्थी हा रोजगारक्षम आणि कौशल्य पूर्ण होत असल्याचे सांगून उच्च शिक्षणातून तुमचे स्वप पूर्ण करण्यासाठी संस्था कायमचं आपल्या सोबत आहे हा विश्वास ही सौ. विखे पाटील यांनी दिला.
यावेळी बोलतांना माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले, प्रवरेत प्रवेश घेतल्यामुळे आपले भविष्य का उज्वल आहे. आपल्या करीअरकडे लक्ष देऊन आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करा शिक्षकाला गुणवत्तेची जोड देऊन पुढे जा असा संदेश दिला.
प्रास्ताविकामध्ये डॉ. संजय गुल्हाने यांनी महाविद्यालयातील सेवा-सुविधा शिस्त विविध विभागाची माहीती दिली. यावेळी प्रा. अनिल लोंढे, पालकांच्या वतीने हमीद सय्यद, डि. आर. रहाणे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सीईटी परिक्षा आणि महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थाचा गौरव मान्यवरांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. नळे यांनी तर आभार डॉ. एल. बी. अभंग यांनी मानले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औद्योगिक, रोजगार आणि स्वयंरोजगार धोरणामुळे रोजगार संधीबरोबरच विविध लघु, मध्यम उद्योगास प्राध्यानेक्रम दिल्याने आज तांत्रिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.