सादतपूर सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी रामभाऊ मगर तर व्हा. चेअरमन पदी गोरक्षनाथ मगर
◻️ महसूलमंत्री ना. विखे पाटील यांच्यासह ग्रामस्थाकडून नुतन पदाधिकाऱ्याचे अभिनंदन
संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथील सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यावेळी सादतपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी रामभाऊ दत्तात्रय मगर यांची तर संस्थेच्या व्हा. चेअरमन पदी गोरक्षनाथ मगर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक आर. एस. वाकचोरे हे उपस्थित होते. यावेळी झालेल्या निवडणूकी दरम्यान इतर अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यानंतर चेअरमन पदी रामभाऊ दत्तात्रय मगर तर व्हा. चेअरमन पदी गोरक्षनाथ किसन मगर यांची निवड झाली.
याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे संचालक बबनराव काळे, दत्तात्रय मगर, दगडु शिंदे, ज्ञानेश्वर गुंजाळ, म्हसु मगर, जालिंदर कडलग, पोपट मगर, मच्छिंद्र गोरे, उत्तम मगर, सूर्यभान बोरसे, गोरक्ष काळे तसेच सरपंच, उपसरपंच तसेच संस्थेचे सर्व संचालक व सोसायटीचे सचिव दिगंबर लबडे, सह सचिव नाईकवाडी व संस्थेचे सभासद हजर होते.
दरम्यान नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचें महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आणासाहेब म्हस्के पाटील, सादपूर ग्रामस्थ तसेच संस्थेच्या सभासदांनी अभिनंदन केले आहे.