◻️ शिवसेनेचे (ठाकरे) शहरप्रमुख अमर कतारी यांचे संगमनेर भाजपवर आरोप
◻️ तर, शासकीय अधिकारी देखिल दबावाला पडलेत बळी
संगमनेर LlVE | दिव्यांग बांधवांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी मागील महिन्यात संगमनेर येथे दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून शिबिराचे आयोजन केले होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयामार्फत संगमनेर तालुक्यातील ३५० दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यात येणार होते. मात्र भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजकीय दबाव वापरून तांत्रिक अडचणीचे कारण देऊन हा कार्यक्रम रद्द केला. केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी दिव्यांग बांधवांना वेठीस धरणे, त्यांचा अवमान करने म्हणजे भाजपची नीतिमत्ता देखिल भ्रष्ट झाली असल्याचे गंभीर आरोप अमर कतारी यांनी केले आहे.
कतार पुढे म्हणाले की, या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील दिव्यांग बांधव दुखावले गेले असून जबाबदार शासकीय अधिकारी यांनी कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे दिव्यांगांचा अवमान झाला असल्याने त्यांच्यावर उच्च स्तरावरून कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य मंत्री तसेच समाजकल्याण मंत्री यांना करणार असल्याचे दिव्यांग सहाय्य सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे यांनी स्पष्ट केले असून संगमनेर ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे तालूकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी सांगितल्याची माहिती शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिली आहे.