◻️ जी - २० अंतर्गत दिल्लीतील कार्यक्रमात गौरव होणार
संगमनेर LIVE| एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्याबाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून जी - २० अंतर्गत कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांना ‘राष्ट्रीय एकता पुरस्कार’ जाहीर झाला असून रविवारी दिल्ली येथे शानदार कार्यक्रमात हा प्रदान करण्यात येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून जी - २० अंतर्गत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय एकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
डॉ. जयश्री थोरात या मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मधील ब्लड कॅन्सर विभागात कार्यरत असून अत्यंत दुर्दम्य असणाऱ्या ब्लड कॅन्सर या आजारातील रुग्णांना त्यांनी आजार मुक्त केले आहे. तसेच कोविड च्या संकट काळात त्यांनी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस काम करून त्यांनी अत्यंत उत्कृष्ट सेवा बजावली आहे .
याचबरोबर सातत्याने महिलांच्या आरोग्याबाबत तळमळ असणाऱ्या डॉ. जयश्री थोरात यांनी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील ग्रामीण महिलांचे आरोग्य, महिला सबलीकरण यांसह महिलांमध्ये आरोग्याबाबत मोठी जनजागृती केली आहे. सातत्याने सामाजिक क्षेत्रातही योगदान देताना त्यांनी दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनासाठी ही पुढाकार घेतला आहे.
त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून त्यांना राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी दु ४ वा. दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये शानदार कार्यक्रमात आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव, सचिव रंजीत सिंह, कर्नल पूनम सिंग, जीएसटी कमिशनर सारांश महाजन, प्रसिद्ध गायक पंडित बलदेवराज वर्मा, निवृत्त न्यायाधीश पिंकी महाजन, अनुप चावला यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
दरम्यान डॉ. जयश्री थोरात यांना मिळालेल्या या राष्ट्रीय एकता पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत थोरात, सुधाकर जोशी, शंकर खेमनर, टाटा कॅन्सर हॉस्पिटल ब्लड कॅन्सर विभागप्रमुख प्रा. डॉ. हसमुख जैन, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, राजेंद्र कडलग, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे यांसह तालुका युवक काँग्रेस, एकविरा फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.