मैत्रीच्या दुनियेतील दिलदार राजा माणूस - माऊली लेंडे

संगमनेर Live
0
मैत्रीतील दिलदार राजा माणूस - माऊली लेंडे

एक भास जो कधीही दुखावत नाही आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही ते म्हणजे मैत्री..

संगमनेर LIVE | मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं असतं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधनं नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं. मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. आईवडीलांमुळे निर्माण झालेली नाती आपल्याला कुटुंबाकडून मिळतात. मात्र, प्रेम आणि आपुलकी असलेली रक्ताची ही नाती आपल्याला आयुष्यभर सोबत करतात. पण मैत्रीची नाती काही वेगळीच असतात. असाच मैत्री कशी निभवावी आणि कशी जपावी याचा उत्तम वस्तुपाठ असलेला दिलदार चिरतरुण राजा माणूस म्हणजे माऊली उर्फे ज्ञानेश्वर लेंडे.

मित्रासाठी या जगात जेवढी विशेषण असतील ती सगळी विशेषण सच्चा मित्र असलेला माऊलीला लागू पडतात. खंदरमाळ या गावातील हा तरुण आपल्या गोड स्वभावामुळे क्षणार्धात समोरच्याला आपलसं करतो. त्याची ही कला खरोखर कुणालाही सहज अवगत करता येणारी नाही हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. एकदा की मैत्रीचा धागा जोडला की तो कधीही तुटू द्यायचा नाही हा जणू दंडकच आहे. अत्यंत मृदू व गोड स्वभाव असल्याने सहजपणे सगळ्यांमध्ये मिसळून जातो. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज या विश्वाचे माऊली बनले. अगदी त्यांच्या शिकवण आणि विचारांवर आमच्या माऊलीची वाटचाल सुरू आहे. 

माऊलीशी अनेक वर्षांपासून मैत्रीची नाळ जुळलेली आहे. ही नाळ फेविकॉलसारखी अत्यंत घट्ट असून, कधीही दुरावा न येणारी आहे. म्हणूनच अनेकजण आम्हांला फेविकॉलचा जोड असल्याचे हसून म्हणतात. माऊली जितका व्यवसाय तितकाच तो सामाजिक कामात अग्रेसर आहे. यातूनच त्याचा अनेकांशी स्नेह जुळलेला आहे. आजकाल मैत्रीत क्षुल्लक कारणावरुन दुरावा आल्याच्या अनेक घटना पाहायला मिळतात. परंतु, माऊलीच्या डायरीत याला कोठेही थारा नाही म्हणूनच तो मित्रांच्या गळ्यातील ताईत बनलाय. आमचा हा माऊली मैत्रीचा वटवृक्ष बनावा यासाठी त्याला जन्मदिनानिमित्त सर्व मित्रांकडून दीर्घ आणि निरोगी आयुष्याच्या खूप सार्‍या शुभेच्छा!

  शब्दांकन :- गणेश लेंडे

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !