◻️आश्वी महाविद्यालयात आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमादरम्यान साधला युवकांशी संवाद
संगमनेर LlVE | आजचे युग डिजिटल क्रांतीचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. याचा विद्यार्थ्यी वर्गाने सकारात्मक वापर करावा असे प्रतिपादन संगमनेरचे तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी धिरज मांजरे यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथिल कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय येथे महसूल विभाग महाराष्ट्र राज्य यांचे विद्यमाने आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात विद्यार्थ्यानश संवाद साधताना तहसील मांजरे बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर, प्राचार्य, प्राध्यापक यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना तहसीलदार धिरज मांजरे म्हणाले की, शासनाकडील बरीचशी कामे आता सर्वसामान्य माणसाना करता येतात. त्यासाठी योग्य त्या अॅप्सचा वापर करणे जमायला हवे, जे शेतकरी निरक्षर आहेत अशा शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी, ई- हक्क नोंदणी अशा गोष्टी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करून द्याव्यात. ई-पिक पाहणी व शासकीय दाखल्यांचे महत्व यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. त्याचबरोबर महसूल विभागाची माहिती देत त्यांनी मतदार नोंदणीचे आवाहन विद्यार्थ्याना केले.
दरम्यान या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.