◻️ महसूल सप्ताहनिमित्त आयोजित युवासंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न
संगमनेर LlVE (लोणी) | माहीती तंत्रज्ञानामुळे आज सर्व योजनाची प्रसार माहीती प्रभावीपणे होत आहे. विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन प्रणाली समजून घ्यावी असे प्रतिपादन लोणीचे मंडळ अधिकारी आर. के. झेंडे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या महसूल सप्ताह निमित्त पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित युवासंवाद निमित्त शिष्यवृत्ती आणि विविध शासकीय योजना जनजागृती अभियान कार्यक्रमात झेंडे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे, एस. आर. ठाकरे, उपप्राचार्य डॉ. बी. डी. रणपिसे आदी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात झेंडे यांनी विविध दाखले, शिष्यवृत्ती साठी आवश्यक कागदपत्रे ती मिळविण्याची प्रक्रिया याविषयी माहीती दिली. प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे यांनी शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयात स्वतंत्र विभाग कार्यरत असल्याचे सांगून महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध दाखले मिळणे आता अधिक सुलभ झाल्याने आणि ऑनलाईन प्रणालीमुळे मोठी आर्थिक बचत होत असून यांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. डी. रणपिसे यांनी तर सुत्रसंचालन आणि आभार डॉ. शांताराम चौधरी यांनी मानले.