आश्वी खुर्द येथे आण्णाभाऊ साठे जंयती निमित्त विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप
◻️ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना १०३ वी जयंतीनिमित्त आश्वी खुर्द येथे अभिवादन
संगमनेर LIVE | महाराष्ट्रातील मराठी साहित्याच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासातील व ज्ञान चळवळीतील महत्वाचे पान असलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना १०३ वी जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे अभिवादन करण्यात आले असून यावेळी जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्याना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संतोष भडकवाड, भाऊसाहेब आव्हाड, दगडू साळवे, रामनाथ साळवे, कैलास गायकवाड, ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे, बाळासाहेब दरेकर, संतोष बर्डे, उमेश सालकर, इन्नुस सय्यद, संजय शिरतार माजी उप सरपंच सुनील मांढरे, विजय गायकवाड, मोहित गायकवाड, विजय कदम, सोमनाथ कदम, बाजीराव दातीर, अभय वाडेकर, बाबासाहेब भोसले, बाळासाहेब राक्षे, आदिनाथ जाधव, सुनील भडकवाड, रघुनाथ औवचिते, एकनाथ मुन्तोडे आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्याना संतोष भडकवाड यांनी शालेय वस्तूचे वाटप केले तर या चिमुकल्यांना विकास गायकवाड उमेश सालकर व इन्नुस सय्यद यांनी खाऊचे वाटप केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाची प्रस्तावना संतोष भडकवाड यांनी मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजीराव दातीर, मोहीत गायकवाड, विकास गायकवाड व भाऊसाहेब आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहुल भडकवाड, संतोष भडकवाड, लक्ष्मण वायदंडे व आयुष शेख यांनी परिश्रम घेतले. तर शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष अभय वाळेकर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले आहेत.