◻️ पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान
संगमनेर LIVE (लोणी) | वाचन, चिंतन, मनन आणि परिश्रमातून विद्यार्थी जीवन घडत असते. या मातीतून घडणारे विद्यार्थी हे उंच झेप घेणारे आहेत. सहकारातून देखिल ग्रामीण शिक्षणाला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मुळे दिशा मिळाली असून प्रवरेच्या मातीतून घडणारे विद्यार्थी हे आदर्श ठरत असल्याचे प्रतिपादन ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांनी केले.
प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुहाच्या वतीने पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात सहकार महर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंती निमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी, क्रिडा क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या पारितोषिक वितरणांत डॉ. शोभणे बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी सौ. अरुणा शोभणे, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, उपाध्यक्ष सतीषराव ससाणे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक अँड. अप्पासाहेब दिघे, लक्ष्मणराव चिंधे, सहसचिव भारत घोगरे आदीसह गुणवंत विद्यार्थी, पालक शिक्षक उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. रविंद्र शोभणे म्हणाले, पद्मश्री नी सहकारात केलेल्या कार्यामुळे झालेले परिवर्तन ही क्रांती ठरली आहे. यातून शिक्षणाला दिशा मिळाली. विद्यार्थ्याची यातून निर्मीती क्षमता वाढली. तरूणांनी आपले स्वप्न बघतांना संस्कार आणि ही भुमी विसरू नका हा संदेश देतानांच तरुणाई ही सळसळती आहे. तिला सरात्मक ऊर्जा द्या. आपले वय हे परिस शोधणांचे असून आपले ध्येय साधा. प्रवरेची ही सुवासिक भुमी आहे आपणह सुवासिक आहातं हेच या कार्यक्रमातून सिद्ध होत असल्याचे सांगितले.
यावेळी सौ. शालीनीताई विखें पाटील यांनी विद्यार्थीनी शिक्षणातून पुढे जातांना प्रवरेची ओळख जागतिक पातळीवर पोहचविली हेच पद्यश्रीचे स्वप्न होते, ते पूर्ण होताना सर्वानीच आपले पाय जमीनीवर ठेऊन काम करावे. शिक्षणातून मिळाल्या संधीतून आदर्श समाज निर्मीती करा असा संदेश दिला.
दरम्यान प्रारंभी प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे यांनी शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी, प्रा. वैशाली मुरादे यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. बी. डी. रणपिसे यांनी मानले.