◻️एन.सी.सी मानवंदना व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सकुलाकडून भव्य आयोजन
◻️ ध्वजारोहण सोहळ्यासाठी विद्यार्थ्यानसह पालक व परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | शिक्षण क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलात ७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे आयोजन करण्यात आले असून लोणी येथील वरद विनायक देवस्थानचे मठाधिपती हभप उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याची माहिती संस्थेचे विजय पिसे यांनी दिली आहे.
मांचीहिल शैक्षणिक संकुल हे नेहमीचं आपल्या शैक्षणिक उपक्रमासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध राहिले असून या शिक्षण संकुलाला राज्यातील नामांकित व्यक्तीमत्व हे भेट देऊन येथिल शिक्षण व परिसराचे कौतुक करत असतात. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांसाठी नामवंत मंडळींनी या सकुंलाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्याचं पार्श्वभूमीवर मंगळवार दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी वरद विनायक देवस्थानचे मठाधिपती हभप महंत उध्दव महाराज मंडलिक येणार असून त्यांच्या हस्ते सकाळी ८.१५ वा. ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना विद्यालयातील एन. सी. सी. पथकातील विद्यार्थी हे मानवंदना व विविध कवायती सादर करणार आहेत. याप्रसंगी संतपूजन व नवनिर्वाचित शालेय मंत्रीमंडळ शपथविधी व पदग्रहण समारंभ पार पडणार आहे. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवर विद्यार्थ्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन करणार आहे. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान या ध्वजारोहण सोहळ्याला विद्यार्थ्यानसह पालक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षण संकुलाच्या वतीने करण्यात आले आहे.