प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ. श्रीनिवास मोतीयेळे यांचे सुयश
डॉ. श्रीनिवास मोतीयेळे यांचे सर्वत्र अभिनंदन
संगमनेर LIVE (लोणी) | भारतीय क्रीडा प्राधिकरण साउथ सेंटर बेंगलोर, कर्नाटक येथे संपन्न झालेल्या एनआयएस जलतरण प्रमाणपत्र अभ्यासक्रममध्ये प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांनी ३०० पैकी १९० गुण (६३ टक्के) प्राप्त करून हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
या अभ्यासक्रम अंतिम सत्रामध्ये मूल्यांकन करण्यासाठी ४०० मी पोहणे, ट्रॅक स्टार्ट डायव्हिंग, वैयक्तिक मिडले, या बाबींचा समावेश होता. डॉ. श्रीनिवास मोतीयेळे यांनी या आधी ही देखील बॉक्सिंग, हेल्थ अँड फिटनेस या स्पोर्ट्स डिसिप्लिन मध्ये एनआयएस प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांना महाराष्ट्र जलतरण संघटनेचे अभय देशमुख, संस्थेचे क्रीडा संचालक डॉ. प्रमोद विखे पाटील, जलतरण प्रशिक्षक अकील शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान डॉ. श्रीनिवास मोतीयेळे यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डाॅ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालक शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, सहशिक्षण अधिकारी प्रा. नंदकुमार दळे, संस्थेचे क्रीडा संचालक डॉ. प्रमोद विखे पाटील,
डॉ. उत्तम अनाप, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय राठी, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सदस्य तसेच ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी पंच प्रा. अभय देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संदीप जगताप आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.