◻️ ह. भ. प. महंत अरुणगिरीजी महाराज (भामाठाण) यांचे अमृततुल्य किर्तण होणार
◻️ लोणी - संगमनेर रस्त्यावरील आईसाहेब मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील सादतपूर गावातील आदर्श माता कै. कोंडाबाई बाबासाहेब पाटील काळे यांचे मागील वर्षी निधन झाले होते. त्यांचे उद्या मंगळवारी प्रथम पुण्यस्मरण होणार असून यावेळी ह. भ. प. महंत अरुणगिरीजी महाराज (भामाठाण) यांचे अमृततुल्य किर्तण होणार असल्याने या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन काळे पाटील कुटुंबियांनी केले आहे.
सादतपूर सह पंचक्रोशीतील गावांमध्ये कै. कोंडाबाई बाबासाहेब पाटील काळे या आदर्श माता म्हणून परिचित होत्या. त्यांनी आपल्या मुलाना व नातवांना शिक्षणासह चांगले संस्कार देखिल दिले आहेत. त्याच्या आदर्श संस्कारांची शिदोरी घेऊन वाटचाल करत असलेल्या काळे पाटील कुटुंबाचे सादतपूर गावातील सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यातील योगदान उठून दिसत आहे. आशा आदर्श माता कै. कोंडाबाई बाबासाहेब पाटील काळे यांचे मागील वर्षी निधन झाले होते.
उद्या मंगळवार दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी त्याच्यां प्रथम पुण्यस्मरणाचे सकाळी ११ वा. सादतपूर शिवारातील लोणी - संगमनेर रस्त्यावरील आईसाहेब मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ह. भ. प. महंत अरुणगिरीजी महाराज (भामाठाण) यांचे अमृततुल्य किर्तणातून आईचे महात्म्य यांचा जागर होणार आहे.
दरम्यान या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन निवृत्ती गहिणाजी पाटील काळे (दिर), एकनाथ म्हसु पाटील शेळके (भाऊ), प्रवरा सहकारी बॅकेचे संचालक बबनराव बाबासाहेब पाटील काळे (मुलगा), सावित्राबाई शिवाजी पाटील निर्मळ (मुलगी), रमेश बाबासाहेब पाटील काळे (मुलगा), रावसाहेब बाबासाहेब पाटील काळे (मुलगा), नानासाहेब बाबासाहेब पाटील काळे (मुलगा), सखाराम सजन पाटील काळे (नातु), तुकाराम सजन पाटील काळे (नातु), विजय नानासाहेब पाटील काळे (नातु), प्रकाश बबन पाटील काळे (नातु), महेश रावसाहेब पाटील काळे (नातु), अमोल बबन पाटील काळे (नातु), संजय नानासाहेब पाटील काळे (नातु), प्रसाद रमेश पाटील काळे (नातु) यांच्यासह संपुर्ण काळे पाटील कुटुंबाने केले आहे.