◻️पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याच्या चेअरमन पदी कैलास तांबे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आश्वी खुर्द ग्रामस्थांकडून सत्कार
संगमनेर LIVE | राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विश्वासाने आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाबरोबरचं ऊस दर नियंत्रण मंडळावर सदस्य म्हणून काम करण्याची मला संधी दिली आहे. त्यामुळे ना. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वोतोपरी फायदा मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करु. अशी ग्वाही पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी दिली आहे.
पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याच्या चेअरमन पदी कैलास तांबे यांची नुकतीच निवड झाली. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामस्थ व सेवा सहकारी सोसायटीकडून आयोजित सत्कार सोहळ्यात चेअरमन कैलास तांबे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते व प्रवरा बॅकेचे संचालक बापूसाहेब गायकवाड होते. जेष्ठ नेते भगवानराव इलग, माजी सरपंच म्हाळू गायकवाड ,सेवा सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर खर्डे, व्हा. चेअरमन भास्कर वाल्हेकर, दुध संस्थेचे चेअरमन मकरंद गुणे, व्हा. चेअरमन विजय गायकवाड, कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, बाळासाहेब मांढरे, अशोकराव म्हसे, हरिभाऊ सोनवणे, विठ्ठल गायकवाड, व्हि. डी. वर्पे, गमाजी गायकवाड, प्रशांत कोडोलिकर, राजेंद्र मांढरे, माजी उपसरपंच संजय गायकवाड, गंगा म्हस्के, प्रकाश गायकवाड, अशोक भोसले, दत्ता गायकवाड, भाऊसाहेब शिंदे, रमेश सिनारे, निलेश भवर, सुयोग सोनवणे, आप्पासाहेब गायकवाड, मोहीत गायकवाड, साई मांढरे, जगदिश सोनवणे, भास्कर बर्डे आदि यावेळी उपस्थित होते.
कैलास तांबे यांनी पुढे बोलताना २००५ साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरवात केल्याचे सांगत चिचंपूर गावचे सरपंच पद, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक पद, संंगमनेर पंचायत समिती सदस्य पद, अहमदनगर जिल्हा आत्मा समिती सदस्य पद, पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक पद व व्हा. चेअरमन पद, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक पद, दुधेश्वर उपसा जलसिंचन योजना चिचंपूर चेअरमन पदी काम करण्याची संधी ना. विखे पाटील यांच्या मुळेचं मिळाल्याची माहिती उपस्थिताना दिली.
तर राज्य शासनाकडून नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या राज्यपातळीवरील ऊस दर नियंत्रण समितीत साखर कारखान्यांचे प्रतिनिधी तसेच आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी दिल्याबद्दल विखे पाटील कुटुंबाचे त्यांनी आभार मानले आहेत.
यावेळी सेवा सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर खर्डे यांनी मनोगत व्यक्त करताना विखे कुटुंब नेहमी शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठाम पणे उभे राहत असल्याचे सांगत कैलास तांबे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी दूध संस्था, सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत आदि पदाधिकारी यांनीही यावेळी कैलास तांबे यांचा सत्कार केला आहे.