◻️ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. पी. शिरभाते यांची माहिती
संगमनेर LlVE | संगमनेर येथिल अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ संलग्नित अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या बी फार्मसी कोर्स चा प्रथम वर्ष प्रथम सत्राचा निकाल विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला असून पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. पी. शिरभाते यांनी दिली.
एप्रिल - मे २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी घोषित करण्यात आला. या परीक्षेत एकूण ६४ विद्यार्थी बसले होते. त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बहुतांश विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. या परीक्षेत कु. वाघ वर्षा हिने ८.६२ SGPA मिळवत प्रथम क्रमांक, खालकर अक्षदा हिने ८.५६ SGPA मिळवत द्वितीय क्रमांक तर अदिती शिंगाडे हिने ८.५५ SGPA मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे.
अमृतवाहिनी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय हे विद्यार्थ्यासाठी सर्व सोयीयुक्त महाविद्यालय असून नव्याने सुरु करण्यात आलेल्या बी फार्मसी कोर्स साठी विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षी प्रशस्त इमारती सोबतच सुसज्ज लॅबोरेटरी, ग्रंथालय, इंटरनेट, मुलामुलींसाठी स्वतंत्र होस्टेल, अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग तसेच अद्यावत सोयी सुविधा पुरविल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात. व्यक्तिमत्व विकासासोबतच विद्यार्थ्यांनी सामाजिक बंधिलकी म्हणुन वेगवेगळ्या ठिकाणी विविध आजार, त्यावरिल उपचार व मेडिसिनस याबद्दल जनजागृती रॅलीचे आयोजन केले जाते.
तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महाविद्यालयात दरवर्षी वेगवेगळ्या कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्युह, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांवर गेस्ट लेक्चर्स, तसेच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास उंचविण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वांच्या व्याख्यानांचे वेळोवेळी आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये असणारे क्रीडा गुण विकसीत होण्यासाठी महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन तसेच महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांना पाठविले जाते. विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख व युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतुन साकारलेला मेधा या युवा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते.
दरम्यान संस्थेचे अध्यक्ष व मा. महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त मा. आ. डॉ. सुधिर तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, संस्थेच्या विश्वस्थ सौ. शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. शिंदे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरभाते एम.पी., शिक्षक व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.