प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ. श्रीनिवास मोतीयेळे यांना राज्य एक्वाथोलोन स्पर्धेमध्ये रौप्य पदक

संगमनेर Live
0
 महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेतर्फे आयोजित राज्य एक्वाथोलोन  स्पर्धा डोंबिवली - ठाणे येथे संपन्न

संगमनेर LlVE (लोणी) | डोंबिवली - ठाणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेतर्फे आयोजित राज्य एक्वाथोलोन  स्पर्धेमध्ये मास्टर गटामध्ये (२०० मीटर स्विमिंग आणि दोन किलोमीटर धावणे) प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ. श्रीनिवास मोतीयेळे यांनी २०० मीटर स्विमिंग आणि दोन किलोमीटर धावणे हे अंतर २३ मिनिट सहा सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण करून रोप्य पदक पटकावले.

त्याचबरोबर प्रवरा अभियांत्रिकीच्या प्रतीक चिंचाने याने ओपन कॅटेगिरी मध्ये ७५० मीटर स्विमिंग आणि पाच किलोमीटर धावणे हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण करून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामधील ओपन कॅटेगिरीच्या खेळाडूंमध्ये नववे स्थान पटकावले. त्यासोबतच प्रवरा अभियांत्रिकीच्या प्रथमेश जाधव, जतिन लाल तसेच प्रवरा तंत्रनिकेतनच्या निसर्ग गुगले यांनी ओपन कॅटेगिरी मध्ये ७५० मीटर स्विमिंग आणि पाच किलोमीटर धावणे हे अंतर यशस्वीरित्या  पूर्ण करून  पहिल्या १५ खेळाडूंमध्ये आपले स्थान पटकावले आहे.

या खेळाडूंना प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ. श्रीनिवास मोतीयेळे, संस्थेचे क्रीडा संचालक डॉ. प्रमोद विखे पाटील, जलतरण प्रशिक्षक अकील शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान या यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीचे सहसचिव भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे अतांत्रिक संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालक प्रा. लीलावती सरोदे, सहशिक्षण अधिकारी प्रा. नंदकुमार दळे, संस्थेचे क्रीडा संचालक डॉ. प्रमोद विखे पाटील, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय राठी, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सदस्य तसेच ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी पंच अभय देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !