◻️ प्रवरा हायस्कूल कोल्हार यांच्यावतीने जणजागृती कार्यक्रमाचे आयोजन
संगमनेर LIVE (लोणी) | शालेय विद्यार्थ्यानी बालपणापासूनचं वाहतूकीचे नियम समजून घेतांनाच ‘नियम पाळा आणि अपघात टाळा’ हे कायम लक्षात ठेऊन रस्ते अपघात टाळावेत असे प्रतिपादन सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि विद्यालयांचे पालक रविंद्र दांडगे यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे यांनी रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन करतांना दांडगे बोलत होते. यावेळी दांडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकरतांना स्कूल बस ड्रायव्हर, यांना अग्निशामक वापर कसा करावा, आपत्कालीन दरवाजाचा वापर, प्रथमोपचार पेटीचा वापर इत्यादी बाबींची माहिती दिली.
महिला वाहतूक कर्मचारी आणि बस ड्रायव्हर यांना मार्गदर्शन केले. विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित प्रवास याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थी दशेपासूनच सर्वांना वाहतुकीचे धडे मिळाल्यास भविष्यातील येऊ घातलेल्या संकटांपासून आपल्याला वाचता येईल. बऱ्याचदा विद्यार्थी आपल्या पालकांकडून गाडी चालवण्याचा आग्रह करतात नियमानुसार अपेक्षित वय पूर्ण न केलेल्या व्यक्तींना गाडी चालवणे हा गंभीर गुन्हा आहे असे त्यांनी सांगितले. या गुन्ह्या अंतर्गत मोठ्या स्वरूपाची शिक्षेचे प्रावधान कायद्यामध्ये केलेले आहे. विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या नियमांचे धडे घेण्यासाठी योग्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच वाहनाचा वापर करावा हेल्मेट आणि सीट बेल्ट हे आपल्या जीवनासाठी संरक्षक कवच म्हणून काम करतात. हेल्मेटच्या वापराने आणि सीटबेलच्या वापराने अपघातामधील मृत्यूचे प्रमाण कमी होते.
शालेय बस मधील साधनांबाबत विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. अपघात समयी आपत्कालीन दरवाजाचा वापर कसा करावा आग लागल्यास अग्निशमन यंत्र कसे वापरावे याची देखील माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. रस्ता वाहतुकीचे नियम आणि सुरक्षा याबाबतची परिपूर्ण माहिती असलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका त्यांनी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी विद्यालयास भेट म्हणून सादर केली.
दरम्यान यावेळी प्राचार्य सुधीर मोरे यांनी कार्यक्रमचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल म्हस्के यांनी तर आभार जी. व्ही. तांबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पी. जी. काळे, एस. ई. कडु यांनी परिश्रम घेतले.