◻️ १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याचे आवाहन
संगमनेर LIVE (लोणी) | भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपाच्या निमित्ताने हर घर तिरंगा, मेरी मिट्टी मेरा देश, पंचप्राण प्रतिज्ञा, वीरोंको वंदन अशा विविध उपक्रमातून प्रवरेच्या चिमुकल्यांना देशभक्तीचा संदेश लोणीच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश स्कुलने दिला.
यावेळी प्राचार्या भारती देशमुख यांनी विद्यार्थ्याना हर घर तिरंगा, देशाच्या मातीचे महत्व, स्वातंत्र्यानंतर झालेली प्रगती आदीबाबत माहीती देत प्रत्येकांनाचे चांगला अभ्यास करून आपल्याबरोबरंच देश हितासाठी कार्य करावे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी करावी असे आवाहन केले.
दरम्यान यावेळी चिमुकल्यांनी ही प्रभात फेरी काढून विविध उपक्रम राबविले. यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर वृंदाचे सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लाभले.