◻️ चिकणी येथे राजहंस स्मार्ट कार्ड वाटप योजनेचा शुभारंभ
◻️ औषधे, पशुखाद्य व उपपदार्थ मिळणार सवलतीच्या दरात
संगमनेर LIVE | राजहंस दूध उत्पादक प्रक्रिया संघ यांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर योजनेचा शुभारंभ चिकणी येथील भागवतबाबाच्यां पावन भूमीत भागवतबाबा सहकारी दूध उत्पादक संस्था चिकणी येथे करण्यात आला . संगमनेर तालूका सहकारी दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते भागवतबाबा सहकारी दूध संस्था चिकणी येथे दूध उत्पादक शेतकरी बाधंवाना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात रणजितसिंह देशमुख म्हणाले, दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना दूध संघाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. स्मार्ट कार्ड ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. स्मार्ट कार्ड मध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती. वर्षभराची दुधाची उलाढाल, आर्थिक उलाढा व्यवहारांची व दुधाचा दर याची माहिती स्मार्ट कार्ड मध्ये समाविष्ट असणार आहे.
शेतकरी कोणत्या दुध संस्थेचा आहे, दूध संघाचा सदस्य आहे शेतकऱ्याची ओळख निर्माण होणार आहे. तसेच पशुवैद्यकीय सेवा माहिती समाविष्ट होणार आहे. यात गाईंचे औषधोपचार याबाबत सर्व काही माहितीचा समावेश असणार आहे. औषध उपचारासाठी औषधे दूध उत्पादक, सभासद शेतकऱ्यांना पाच टक्के सवलतीच्या दारात मिळणार आहे.
संघाचे अधिकृत उपपदार्थवर पाच टक्के सवलती मध्ये मिळणार आहे. हे कार्ड फक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे. तसेच पशुखाद्य सवलतीच्या दरात या कार्डवर मिळणार आहे. त्यामध्ये एक लाखाचे विमा कवच मिळणार आहे. भविष्यात अनेक योजनांचा लाभ कार्डवर मिळणार आहे.
दरम्यान याप्रसंगी संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक विलासराव वर्पे, भास्करराव सिनारे, विलासराव कवडे, संतोष मांडेकर, सहादू वर्पे, विष्णूबाबा वाघमारे, बादशहा वर्पे, सुखदेव वर्पे, नानाबाबा वर्पे, राधाकिसन पाटोळे, ज्ञानदेव वर्पे, सरपंच प्रियंका माळी, उपसरपंच चंद्रभान मुटकुळे, आनंद सहाणे, सोसायटी चेअरमन दत्तात्रय मुटकूळे, व्हा. चेअरमन कैलासराव वर्पे, भागवतबाबा सहकारी दूध संस्थेचे चेअरमन दत्तात्रय वर्पे, व्हा. चेअरमन सौ. प्रियंका वर्पे व सर्व संचालक मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्खेंने उपस्थित होते.