◻️ प्राचार्य डाॅ. जी. बी. शिदे यांची माहिती
संगमनेर LIVE (लोणी) | चिंचोली येथील सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल व्हिजिटद्वारे जडणघडण होते. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट हा विषय खूप महत्त्वाचा असतो.
या प्लेसमेंटचे मार्गदर्शन व प्रक्रिया समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी इंडस्ट्रियल व्हिजिट आयोजित केली जाते, या व्हिजिटद्वारे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटबद्दलचे ज्ञान आणि सध्या कंपनीत असलेले तंत्रज्ञानाची माहिती मिळाले अशी माहीती प्राचार्य डाॅ. जी. बी. शिदे यांनी दिली.
दरम्यान चिंचोली येथील सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने नुकतीच विद्यार्थ्यांसाठी नाशिक येथील एजाकस टेक्नोलॉजीज पीवीटी. एलटीडी. आयटी कंपनीमध्ये भेट घडवून आणली.
विद्यार्थी व शिक्षक यांना कंपनीकडून बरीच माहिती व मार्गदर्शन मिळाले. प्रा. अर्चना उगले, प्रा. संचीता नवले यांनी विभागप्रमुख प्रा. ऋषिकेश भालेराव व प्राचार्य डॉ. जी. बी. शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट आयोजित करण्यात आली होती.