◻️ जिल्हा पितळीवरील स्पर्धेसाठी निवड
संगमनेर LIVE (लोणी) | एन. सी. इ. आर. टी. नवी दिल्ली व एस. सी. ई. आर. टी. रविनगर नागपूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शक तत्वानुरुप नुकतीच श्री यशवंतरावं चव्हाण माध्यमिक विद्यालय राजुरी येथे पंचायत समिती शिक्षण विभाग राहाता आणि तालुकास्तरीय विज्ञान गणित अध्यापक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धा इयत्ता ८ वी ते १० वीच्या गटातील विद्यार्थ्यांची घेण्यात आली. यामध्ये प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीची कु आनम कलीम पटेल ने पटकवला प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.
भरड धान्य एक पौष्टीक अन्न की आहार - भ्रम हा विषय होता. या स्पर्धेचे उदघाट्न गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजेश पावसे, शिक्षण विस्ताराधिकारी संभाजी पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश विखे, केंद्र प्रमुख सिनारे, राहाता तालुका विज्ञान संघ अध्यक्ष अनिल लोखंडे, गणित संघ अध्यक्षा सौ. वैशाली रोकडे, मुख्याध्यापक महेंद्र जेजुरकर, सुनील गायकवाड, विविध शाळांचे विज्ञान शिक्षक व शिक्षिका आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुनील आढाव, सुनील चिंधे यांनी काम पाहिले.
या प्रसंगी राजेश पावसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भरड धान्य् हे पौष्टीक असून नियमित घेतल्याने मानवाची त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते व चांगली ऊर्जा मिळते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. याउलट स्नॅक्स किंवा जंक पदार्थ सेवणाने लठ्ठपणा, निस्तेजपणा येऊ शकतो, म्हणून भरडले जाणारे व आपल्याकडे सर्वत्र उपलब्ध होवू शकणारे भरड धान्य अन्न म्हणून सेवन केले पाहीजे. आहारात जास्त प्रमाणात वापरले जावेत. या स्पर्धेच्या नियम व अटी तसेच मूल्यमापण बाबत सविस्तर माहिती देत प्रस्ताविकपर मार्गदर्शन विज्ञान संघाचे अध्यक्ष अनिल लोखंडे यांनी दिली.
संभाजी पवार यांनी मार्गदर्शन करतांना देशाने हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून घोषीत केले आहे. त्याला आहारात आणावे असे मत मांडले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेत एकूण २६ विद्यार्थ्यी सहभागी झाले त्यांनी बनवलेल्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग करुन आपले मत पटवून दिले. यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीची विद्यार्थ्यीनीं कु. आनम कलीम पटेल हिस मिळाला, तर द्वितीय क्रमांक कु. भालेराव तन्वी शरद (महात्मा गांधी कन्या विद्यालय प्रवरानगर) हिने मिळवला. दोन्हीची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली.
दरम्यान कु.आनम पटेल हिने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, विस्ताराधिकारी संभाजी पवार, सहसचिव भारत घोगरे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. एल. बी. सरोदे, समन्वयक शिक्षण नंदकुमार दळे, विद्यालयाच्या प्राचार्या सौ. भारती कुमकर व सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.