श्रावणी सोमवारनिमित्त कॉंग्रेसनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी श्री. क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिरात केली पुजा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री. क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारची महापुजा कॉंग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी आमदार थोरात यांनी ईश्वराकडे सर्वत्र चांगला पाऊस होऊन राज्यातील सर्व जनता सुखी होऊ दे अशी प्रार्थना केली.
खांडगाव देवस्थानच्या वतीने तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त ही पूजा झाली. यावेळी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानुभाऊ गुंजाळ, स्वामी दयानंद गिरी महाराज,रमेश गुंजाळ, अशोक गुंजाळ, ॲड. मधुकरराव गुंजाळ, सरपंच विकास गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, नितीन अभंग, संजय गुंजाळ, छायाताई गुंजाळ, विजय रहाणे, ॲड. विठ्ठल गुंजाळ, दशरथ बालोडे, कैलास गोसावी यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा सह्याद्री पर्वताच्या कुशीत असून निसर्ग संपन्न तालुका आहे. खांडगाव हे तालुक्याचे आराध्य दैवत असून पिढ्यानपिढ्या लोक येथे दर्शनासाठी येत असतात. संगमनेर शहरातील अनेक व्यापारी पायी दर्शनाला येतात. खांडेश्वर येथे शासकीय योजनांच्या माध्यमातून सुंदर तीर्थक्षेत्र बनवली असून चांगला पाऊस होऊन राज्यातील शेतकरी, सर्व नागरिक, सुखी, समाधानी होऊ दे आणि विविध परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र देशात आणखी प्रगतीशाली होऊ दे अशी प्रार्थना आमदार थोरात यांनी केली.
दरम्यान या पूजेनंतर आमदार थोरात यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.