◻️ अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यासह नागरीकाच्या आरोग्य तपासणीच्या सुचना
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा प्राथमिक आरोग्य उप केंद्र कोकणगाव येथे राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देत पाहणी करुन ‘आयुष्मान भव ’ अभियानाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले आहे.
नुकतीच ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राथमिक आरोग्य उप केंद्र कोकणगाव येथे भेट दिली होती. याप्रसंगी त्यांनी आरोग्य केंद्राची पाहणी करीत तेथील सेवा सुविधांची माहिती घेताना सुरु असलेले आरोग्य कार्यक्रम व ‘आयुष्मान भव ’ अभियानाचा आढावा घेतला. तसेच यावेळी मार्गदर्शन करताना ना. विखे पाटील यांनी अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यासह ३० वर्षांवरील नागरीकाच्या आरोग्य तपासणी करण्याच्या सुचना उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या आहेत. यावेळी निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती जाणून घेत दोन्ही आरोग्य केंद्रांच्या कामगिरीबाबत ना. विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, वैद्यकीय अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी, वैद्यकिय अधिकारी डॉ. देविदास चोखर, सिएचओ सचिन गवारे, आरोग्य सेविका श्रीमती बालिका हासे, आरोग्य सेवक दिपक महाजन, आशा सेविका, परिचर आदि उपस्थित होते.