◻️ आश्वी सह संगमनेर तालुक्यातून संतोष भडकवाड यांच्या निवडीचे स्वागत
◻️ तालुक्यात आनंदोत्सव ; ठिक - ठिकाणी मान्यवराकडून भडकवाड यांचा सत्कार व अभिनंदन
संगमनेर LIVE | गावकुसाबाहेर असलेला समाज हा अर्थिक तसेच सामाजिक न्यायापासून वंचित आहे. हा समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा व त्यातून सामाजिक व आर्थिक क्रांती व्हावी यासाठी प्रसंगी पदरमोड करुन लढणारे संगमनेर तालुक्यातील आश्वी खूर्द येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष भडकवाड यांची भारतीय लहुजी सेनेच्या ‘महाराष्ट्र राज्य सचिव’ पदी सेना प्रमुख व्ही. जी. रेड्डी यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.
संतोष भडकवाड हे आश्वी सह पंचक्रोशीत आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. त्याच्या यांचं कामाची दखल घेऊन भारतीय लहुजी सेनेचे सेना प्रमुख व्ही. जी. रेड्डी यांच्या आदेशानुसार ‘महाराष्ट्र राज्य सचिव’ पदी नियुक्ती करुन त्यांना समाजाचे संघटन करुन न्याय हक्कासाठी लढण्यासाठी ताकद देण्यात आली आहे. या नियुक्ती पत्रावर राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, राज्य संघटक भाऊसाहेब आव्हाड, दगडू साळवे, जिल्हा संघटक राजेंद्र त्रिभुवन यांच्या सह्या आहेत.
समाजातील सच्चा कार्यकर्त्याला न्याय देण्यात आल्यामुळे समाजात आनंदाचे वातावरण असून त्यांच्या निवडीचे संगमनेर तालुक्यात जोरदार स्वागत होत असून ठिकठिकाणी मान्यवरांकडून संतोष भडकवाड यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान संतोष भडकवाड यांची लहुजी सेनेच्या ‘महाराष्ट्र राज्य सचिव’ पदी नियुक्ती झाल्याबद्दल लहुजी सेनेचे राज्य प्रमुख सुरेश अडांगळे, राज्य कार्याध्यक्ष समीर वीर, राज्य सरचिटणीस रामभाऊ पिंगळे, जिल्हाध्यक्ष रज्जाकभाई शेख, प्रसिध्दी प्रमुख रईसभाई शेख, राहाता तालुकाध्यक्ष रामजी साळवे, रघुनाथ बलसाने, मंजाबापू साळवे, बाळासाहेब राक्षे, वालिद शेख,
आश्वी खुर्दचे जेष्ठ नेते अण्णासाहेब भोसले, विखे पाटील कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, अॅड. अनिल भोसले, मकरंद गुणे, कांचनताई मांढरे, माजी सरपंच म्हाळू गायकवाड, माजी उप सरपंच संजय गायकवाड, कैलास गायकवाड, विजय गायकवाड, बाबासाहेब भोसले, विकास गायकवाड, दिपक सोनवणे, सुनील मांढरे, मोहित गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, दगडू गायकवाड, अनिल मुन्तोडे, जगदीश मुन्तोडे, सुनील महाराज पवार, प्रा. खर्डे, विजय गायकवाड, शरद सोनवणे, आशिष गायकवाड, जगदीश मुसमाडे, गौरव मुन्तोडे, गाडेकर,
यशवंत वाल्हेकर, रमेश शिनारे, प्रकाशराव सोनावणे, विठ्ठल वर्पे, राजेंद्र गायकवाड, युन्नुस सय्यद, देविदास भडकवाड, शुभम भवर, देविदास वाळेकर, गजानन मांढरे, अशोक साळवे, एकनाथ मुन्तोडे, किशोर गायकवाड, संजय भोसले, संजय देशमुख, अण्णा नांगरे, विठ्ठल मांढरे, निलेश भवर, अण्णा भडकवाड, गुलाब भडकवाड, मेजर रावसाहेब भडकवाड, अशोक साळवे, फकिरा मोरे, सुनील सोनावणे आदींसह ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.