◻️ संगमनेर शहर व तालुका शिवसेनेची (ठाकरे) तहसीलदार यांना निवेदन देत मागणी
◻️ नाफेड मार्फत कांदा खरेदी बाबत अटी व शर्थी शिथिल करण्यासाठी शिवसेना आक्रमक
संगमनेर LIVE | संपूर्ण संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापुस, भुईमूग हि पिके पुर्णपणे जळाली असून ती चाऱ्यायोग्य सुद्धा राहिलेली नाही. तसेच तालुक्यात पाण्याची सुध्दा टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारा सुध्दा शिल्लक राहिला नसून शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने यांची तात्काळ दखल घेऊन “संगमनेर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त” जाहीर करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई घ्यावी, अशी मागणी संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिवसेनेने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तालुक्यातील ज्या गावांनमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा गावांना टॅकर मार्फत पाणी पुरवठा चालू करण्यात यावा. लम्पी आजार राज्यात वाढत असल्याने आपणास छावणी देता येणार नाही तेव्हा प्रत्येक गावात तात्काळ चारा तात्काळ देण्यात यावा ह्या आग्रही मागण्यानसोबतच नाफेडमार्फत सुरु असलेले कांदा खरेदी केंद्रा बाबत मागणी करतं नाफेडच्या जाचक आटी व शर्थी शिथिल करून नियम बदलण्यात यावेत व तमाम शेतकरी बांधवांना या दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन भरीव मदत करावी. अशा आशयाचे निवेदन संगमनेर शहर व तालुका शिवसेना (ठाकरे) यांच्या मार्फत तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत संगमनेर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नाफेडच्या अटी शिथिल करण्याची मागणी शिवसेनेच्या शहर व तालुक्यातील पदाधिकारी यांनी करुन शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार सर्व शिवसैनिक हे शेतकरी बांधवांच्या सोबत उभे असून प्रशासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती शहर प्रमुख अमर कतारी यांनी केली. तसेच कोणतेही राजकारण न करता प्रशासनाने आमच्या मागणीकडे त्वरित सहानुभूतीपूर्वक विचार करावा व शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी विनंती तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे, युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, विद्यार्थी सेना उप जिल्हाप्रमुख परवेज शेख, विभाग प्रमुख विजय भागवत, शहर संघटक दीपक साळुंखे,
शिवसेना तालुका सचिव संदीप राहणे, सचिव कचरू पाटील वारुंगशे, उप तालुकाप्रमुख शरद कवडे, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, उप शहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी, इम्तियाज शेख, दीपक वन्नम, शाखाप्रमुख प्रकाश चोथवे, रहीम बेग, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख सदाशिव हासे, विधानसभा प्रमुख रंगनाथ फटांगरे, ब्रह्मा खिडके, प्रशांत खजुरे, त्रिलोक कतारी व शिवसैनिक तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.