संगमनेर LIVE | राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत असताना संगमनेर मधील मतिमंद व मूकबधिर विद्यार्थ्यांनी या उत्साहात विविध वेशभूषा करून अत्यंत आनंदाने सहभागी होत दहीहंडीचा सण साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांची वेशभूषा व या मतिमंद विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.
संग्राम करिअर अकॅडमी संचलित डॉक्टर देवेंद्र अहोरा निवासी मतिमंद विद्यालयात दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला. यावेळी मुख्याध्यापक चांगदेव खेमनर, प्रकल्प प्रमुख शैला जाधव, विकास भालेराव, मनोरमा निकम, राजू गोरे, प्रवीण थोरात, मंगल देशमुख, अनिता सोनवणे, गायकवाड ताई आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या संग्राम मतिमंद व मूकबधिर विद्यालयाने सातत्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम केले आहे आदर्शवत काम करणाऱ्या या संस्थेमुळे राज्यभरातील मतिमंद व मूकबधिर विद्यालयांसाठी हे विद्यालय मॉडेल ठरले आहे.
या विद्यालयात सातत्याने विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जात असून काल दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला यावेळी या मतिमंद विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा व सादर केलेले कलागुण यामुळे उपस्थित सर्व पालक व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या यशस्वी उपक्रमाबद्दल या विद्यार्थ्यांचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. रसाळ यांचे सह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.