◻️ प्रवरेच्या सहकारी पतसंस्थेची ४८ वी वार्षिक सर्वसाधरण सभा संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | सहकारात प्रवरेचे योगदान महत्वपूर्ण असून पारदर्शक कारभार करत प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी सेवकांची सहकारी पतसंस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सभासदांच्या हिताबरोबरचं सामाजिक उपक्रमातून आदर्श काम केले आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोणीच्या प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधरण सभेत सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. विद्यादेवी घोरपडे, उपाध्यक्षा सौ. शशिकला खेतमाळीस, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, शिक्षण समन्वयक प्रा. एन. डी. दळे, प्राचार्या भारती कुमकर, भारती देशमुख संचालक प्रा. संजय उबरकर, शशीकांत आहेर, संपत विखे, मच्छींद्र ढोकचौके, रमेश सानप, भाऊसाहेब घोडे, राजेंद्र तुपे, शिवाजी शिंदे, भिमराज चिंधे, सुनिल गागरे, व्यवस्थापक गणेश गिते, बबन म्हसे, गौरी आहेर आदीसह सभासद उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. विखे पाटील म्हणाल्या, शिक्षकांसाठी ही पतसंख्या महत्वपूर्ण ठरली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारातून स्थापन झालेल्या प्रवरेतील सहकारी संस्था या समाज उभारणीत महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. संस्थेने कर्ज वितरण आणि कर्ज वसुलीसह सभासद हिताचे निर्णय घेतल्याने संस्थेच्या नावलौकीकांत भर पडली असून संस्थेच्या नुतन इमारती साठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ही आश्वासन सौ. विखे पाटील यांनी दिले.
प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा सौ. विद्यादेवी घोरपडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल घेतला. यावेळी सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थी यांचा गौरव संस्थेच्या वतीने करण्यात आला. विषय पत्रिकेतील सर्वच विषय एक मताने मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संजय उंबरकर यांनी तर आभार प्रा. शिवाजी शिंदे यांनी मानले.