◻️ १५० स्पर्धकांमधून कु. दिपिका येवले हिने पटकावले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक
संगमनेर LIVE (लोणी) | रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता येथे राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रवरा इंग्लिश मिडीयम स्कुलची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. दिपिका उत्तम येवले हिने लहान गटातून १५० स्पर्धकांपैकी मला भावलेले कर्मवीर भाऊराव पाटील या विषयावर अत्यंत प्रभावी शैलीत वक्तृत्व करून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सह रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळवले आहे.
या विद्यार्थिनीचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे, विद्यालयाच्या प्राचार्या भारती देशमुख, पर्यवेक्षिका सौ. रत्नपारखी, सौ. घोगरे यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान या विद्यार्थिनींला विद्यालयाच्या विषय शिक्षिका सौ. मनीषा गायकर आणि सौ. विजया वाघ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.